घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८३० नव्या रूग्णांची नोंद, ११...

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८३० नव्या रूग्णांची नोंद, ११ मृत्यू

Subscribe

मुंबईत कोरोनाबाधितांसह मृत्यूचा आकडा घटत असताना आज बुधवारी अचानक कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले तर दिलासादायक म्हणजे कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या घटली आहे. मुंबईत बुधवारी गेल्या २४ तासात ८३० नव्या रूग्णांचे निदान करण्यात आले असून ११ जणांनी आपला प्राण कोरोनामुळे गमावला आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या नोंद नुसार, ५०० हून अधिक नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

२४ तासात १३०० रूग्णांनी केली कोरोनावर मात

गेल्या २४ तासात मुंबईत ८३० कोरोना बाधितांची नोंद करण्यात आल्याने आतापर्यंत हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ७ लाख १८ हजार ५१३ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासात १३०० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८६ हजार १२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार २२७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच गेल्या २४ तासात ११ जणांचा कोरोनाने मृ्त्यू झाल्याने हा आकडा वाढून १५ हजार २२७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ६६ लाख ९३ हजार ९१० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आज दिवसभरात २९ हजार ५८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कोरोना मुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर

मुंबईतील कोरोना मुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७२७ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या २० दिवसांवर आली आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५ रुग्ण पुरुष व ६ रुग्ण महिला होते. १० रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित १ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -