घरताज्या घडामोडीवंचित आघाडीला धक्का; आनंदराज आंबेडकर आघाडीतून बाहेर

वंचित आघाडीला धक्का; आनंदराज आंबेडकर आघाडीतून बाहेर

Subscribe

आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एक भाग असलेल्या आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

एकीकडे राज्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या लागोपाठच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित असं यश न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमावर पुनर्विचार करण्याची वेळ आलेली असतानाच आता प्रकाश आंबेडकरांना अजून एक धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली असून प्रकाश आंबेडकरांचेच बंधू आणि बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा निर्णय जाहीर केला आहे. ‘यापुढे संपूर्ण राज्यात रिपब्लिकन सेनेचा विस्तार करणार’, असं देखील त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.

काय म्हणाले आनंदराज आंबेडकर?

‘रिपब्लिकन सेनेच्या वतीने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंबेडकरी जनतेला पुन्हा एकत्र करण्याचा आणि खऱ्या अर्थाने त्यांना सत्तेच्या दिशेनं घेऊन जाण्याचा निश्चय आम्ही केला आहे. वेगवेगळ्या गटातटांतून अनेक लोकं आज रिपब्लिकन सेनेमध्ये येत आहेत. त्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी आणि पक्षाची उभारणी सुरू झालेली आहे’, असं यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेला कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा जरी नसला, तरी त्यांचा हा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये निश्चितच फूट पाडू शकतो, असं आता बोललं जाऊ लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -