घरअर्थजगतजुन्या 500, 1000 नोटांच्या 'त्या' पोस्टबद्दल पीआयबीचे स्पष्टीकरण; म्हणाले...

जुन्या 500, 1000 नोटांच्या ‘त्या’ पोस्टबद्दल पीआयबीचे स्पष्टीकरण; म्हणाले…

Subscribe

भारतातील नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक बातम्या आणि अफवा समोर येत आहेत. बऱ्याच नोटाबंदनंतर काही जणांकडे जुन्या नोटा सापडल्याच्या तक्रारी समोर येत असतात तर, अनेकदा या जुन्या नोटा पुन्हा चलनात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात.

भारतातील नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक बातम्या आणि अफवा समोर येत आहेत. बऱ्याच नोटाबंदनंतर काही जणांकडे जुन्या नोटा सापडल्याच्या तक्रारी समोर येत असतात तर, अनेकदा या जुन्या नोटा पुन्हा चलनात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. असे असतानाच पुन्हा एकदा या 500 आणि 1000 च्या नोटांबद्दल अफवा पसरवली जात आहे. ती म्हणजे आरबीआयने जुन्या नोटा बदलण्यासाठी कालावधी वाढवला असल्याचे सांगितले जात आहे. (reserve bank of india big update on old 500 and 1000 rupees note you can exchange it now)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विदेशी नागरिकांसाठी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्याची सुविधा आणखी वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, याबाबचे गांभीर्य पाहता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक टीमने (पीआयबी फॅक्ट चेक) या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणले आहे. पीआयबीच्या रिपोर्टनुसार, या व्हायरल पोस्टची सत्यता तपासण्यात आली आहे. फॅक्ट चेक केल्यानंतर ही पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदीची घोषणा केली होती. यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून देशात ५०० आणि १००० रुपयांच्या चलनावर बंदी घालण्यात आली. मात्र, यानंतर लोकांना बँकेतून नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, आपल्याला असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करण्याची आणि घाबरण्याची गरज नाही. कारण असे फेक मेसेज आल्यास तुम्ही त्या मेसेज अथवा पोस्टची सत्यता तपासू शकता तपासणी देखील करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. शिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: [email protected] वर संबंधित मेसेज अथवा पोस्टची पडताळी करू शकता.


हेही वाचा – खुशखबर! रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार जेवण आणि कोल्डड्रिंक मोफत, वाचा नेमके कसे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -