घरदेश-विदेशनियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील दोन सहकारी बँकांसह चार बँकांवर RBI ची कारवाई

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील दोन सहकारी बँकांसह चार बँकांवर RBI ची कारवाई

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चार सहकारी बँकांकडून दंड वसूल केला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने मंगळवारी हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर 112.50 लाखांचा दंड आकारला. यासह अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेवर 37.50 लाख रुपये आणि मुंबईच्याच सारस्वत सहकारी बँकेवर 25 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

म्हणून केली कारवाई

केंद्रीय बँकेच्यामते, आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘आपले ग्राहक ओळखा’ या संबंधित आरबीआय निर्देशांचं पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. तर अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला ‘ठेवीवरील व्याज दरा’वरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. यासोबतच एसव्हीसी सहकारी बँकेने ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘फसवणुकीचे निरीक्षण व अहवाल देणारी यंत्रणा’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलं. ‘ठेवीवरील व्याज दर’ आणि ‘ठेव खाती देखभाल’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सारस्वत सहकारी बँकेकडून हा दंड आकारण्यात आला.

- Advertisement -

दोन सहकारी बँकांसह चार बँकांवर RBI ने कारवाई केल्यानंतर RBI ने असे म्हटले की, नियामक अनुपालनातील कमतरतेच्या आधारे हा दंड आकारण्यात आला आहे. यातून बँकांनी त्यांच्या ग्राहकांद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता दर्शवण्याचा हेतू नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी देखील RBI ने तीन सहकारी बँकांविरोधात कारवाई केली होती. 22 जून रोजी तीन सहकारी बँकांवर विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 23 लाख रुपयांचा दंड आकारला होता. आरबीआयने मोगावीरा सहकारी बँक लिमिटेडवर 12 लाख रुपये, इंदापूर शहरी सहकारी बँकेवर 10 लाख रुपये आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड, बारामतीवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -