विद्यावेतनाचा मुद्दा तापणार, नायरच्या डॉक्टरांचा काळ्या फिती लावून निषेध

निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन उशिरा देण्यात येत असून इतरही सुरक्षेच्या प्रश्नांवर अद्यापही मागण्या प्रलंबित आहेत. याचा लवकरात लवकर तोडगा काढवा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल.

doctor asking physical pleasure as commission from pharma companies
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचे लोण आता मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये पसरले असून बुधवारी नायर हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांनी देखील आंदोलन निषेध केला आहे. बुधवारी काळ्या फिती लावून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर देखील सहभागी झाले होते. लातूरसह मुंबईतील काही मेडिकल कॉलेजसने देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. तर, मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याच्या तयारीत असल्याचे येथील स्थानिक मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

फळे विकून केले आंदोलन

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेने दोन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन उशिरा देण्यात येत आहे. तसेच, इतरही सुरक्षेच्या प्रश्नावर अद्यापही मागण्या प्रलंबित आहेत. याच पार्श्वभूमीवर सायन हॉस्पिटलमधील स्थानिक मार्ड संघटनेने फळे विकून आंदोलनाला पाठींबा दिला. तर, नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली.

आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक असून निर्णय घेण्यात येईल. मात्र, प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल. मध्यवर्ती मार्ड कडून सुरु केलेल्या आंदोलनाला प्रत्येक रुग्णालयाच्या स्थानिक मार्डकडून पाठींबा देण्यात आला आहे.  – डॉ. विशाल राख, नायर रुग्णालय स्थानिक मार्ड अध्यक्ष


वाचा – विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची ‘फळ विक्री’ मोहीम