घरमुंबईकेईएमच्या निवासी डॉक्टरांनी फळे विकून केले आंदोलन!

केईएमच्या निवासी डॉक्टरांनी फळे विकून केले आंदोलन!

Subscribe

सायन रुग्णालया पाठोपाठ आता केईएम रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी फळे विकून सरकारविरोधात निषेध केला आहे.

राज्यातील चार मेडिकल कॉलेजमधील हजार निवासी डॉक्टरांना विद्यावेतन न मिळाल्याने या कॉलेजमधील डॉक्टरांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या विद्यावेतनामुळे निवासी डॉक्टरांचा संताप होत असून आता हे डॉक्टर सरकारचा निषेध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील मेडिकल कॉलेजेसने देखील आपला पाठींबा दर्शवला आहे. शीव रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांनी दर्शवलेल्या पाठींब्यानंतर गुरुवारी केईएमच्या निवासी डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या आवारात फळांची विक्री केली आहे. राज्यातील लातूर, नागपूर, अंबेजोगाई, औरंगाबाद या मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे, राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टर फळं विक्रेते बनत हे आंदोलन करत आहेत.

हवं तसं स्टायपेंड मिळत नाही

राज्यातील ४ मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांना विद्यावेतन न मिळाल्याच्या कारणावरुन तिथल्या डॉक्टरांनी निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आहे. निवासी डॉक्टर २४ तास काम करत असतात. पण, हवं तसं स्टायपेंड मिळत नाही. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांना आम्ही पाठींबा दर्शवण्यासाठी हा फ्रूट स्टॉल लावला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. शिनगारे यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यातून तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र केलं जाईल.  – डॉ. आलोक सिंह, केईएम रूग्णालयातील मार्डचे अध्यक्ष

- Advertisement -

राज्यातील एक हजार निवासी डॉक्टरांना नोव्हेंबर महिन्याचं मानधन मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी फळ विक्रेते बनून शांततेच्या मार्गने आंदोलन सुरू केलं आहे. याविषयी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयासोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास येत्या शुक्रवारी आणि शनिवारी राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवू.  – डॉ. लोकेशकुमार चिरवटकर, केंद्रीय मार्ड अध्यक्ष


वाचा – विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची ‘फळ विक्री’ मोहीम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -