घरमुंबईविद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची 'फळ विक्री' मोहीम

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची ‘फळ विक्री’ मोहीम

Subscribe

सायन हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून 'फळ विक्री' मोहिमेला सुरुवात केली. विद्यावेतन मिळावे यासाठी डॉक्टर्स ही मोहीम राबवित आहेत.

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबाद या वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी सुरु केलेल्या ‘फळ विक्री’ या मोहिमेला मुंबईतील डॉक्टरांनी ही सपोर्ट केला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर्स हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाबाहेर फळ विकत होते. ऐरवी अॅपरन आणि स्टेथस्कोप घालून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स मंगळवारी हॉस्पिटलबाहेर फळ विकताना दिसत होते. त्यामुळे येणारे-जाणारे लोक, रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक या स्टॉलकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. १५० हून अधिक निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या उपचारांवर या मोहिमेचा परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टर त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन फळ विकत होते.

हेही वाचा – विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर करणार ‘रास्ता रोको’

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्यातील १००० निवासी डॉक्टरांना विद्यावेतन (स्टायपेंड) न मिळाल्याने डॉक्टर आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. राज्यातील नागपूर, बीड, औरंगाबाद आणि लातूरच्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी ‘फळ विक्री’ मोहिम हाती घेतली आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही फळांची विक्री केली.सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनानंतर जे.जे हॉस्पिटल येथील निवासी डॉक्टरही हॉस्पिटलमध्ये विरोध दर्शवणार आहेत.

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अनेक हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना विद्यावेतन दिलं जात नव्हतं. पण, आंदोलन करण्याचा निर्णय घेतला की, एका महिन्यात विद्यावेतन दिलं जायचं. पण, पुन्हा तीच परिस्थिती होती. त्यामुळे, अनेक डॉक्टर्सवर आर्थिक संकट आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईतील डॉक्टर्सही शांततेच्या मार्गातून निषेध व्यक्त करत आहेत. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर डॉक्टरांचा उद्रेक होईल. मग, राज्यभर आंदोलन पुकारलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे.
– डॉ. लोकेश चिरवटकर, केंद्रीय मार्डचे अध्यक्ष

हेही वाचा – इंटर्न डॉक्टरांचा संप मिटला! आश्वासनानंतर निर्णय

काय आहेत मागण्या?

  • स्टायपेंड व्यतिरिक्त निवासी डॉक्टरांना सुरक्षेचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रुग्णांचे नातेवाईक अनेकदा डॉक्टरांवर हल्ला करतात. त्यामुळे सिक्युरिटी ऑडीट किंवा अलार्म सिस्टिम अशा अनेक गोष्टींवर सरकारने निर्णय घेतलेला नाही.
  • डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे बॉन्ड अलॉटमेंट म्हणजेच बंदपत्रित सेवा अजूनही ऑफलाईन आहे. त्यामुळे ते डॉक्टर्स जिथे गरज आहे त्या परिसरात त्यांची सेवा देऊ शकत नाहीत. ती सेवा ऑनलाईन करावी.
  • मोठ्या प्रमाणात मेडिसीन्स उपलब्ध होत नाहीत. ते उपलब्ध व्हावेत.
  • राहण्याची सेवा नाही. ती सेवा करावी.
  • २४ तास ,४८ तास डॉक्टर्स काम करतात. त्यांना किमान गरजेच्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -