जोगेश्वरी : म्हाडा कॉलनीतील इमारतीला आग

जोगेश्वरी येथील मिल्लत नगर परिसरात म्हाडाच्या कॉलनीतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Resident Society fire in Jogeshwari
जोगेश्वरीतील मिल्लत नगर परिसरातील रहिवाशी सोसायटीला आग

जोगेश्वरी येथील मिल्लत नगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मिल्लत नगर मधील म्हाडा कॉलनीतील शांतीवन सोसायटीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शांतीवन सोसायटीच्या तिसऱ्या मजल्याला ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत.

अंधेरी – म्हाडातील अहूजा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

अंधेरी – म्हाडातील अहूजा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜುಲೈ 18, 2019