घरमुंबईराज्यातील निवासी डॉक्टरांचा बुधवारी संप

राज्यातील निवासी डॉक्टरांचा बुधवारी संप

Subscribe

वेळेवर वेतन न मिळणे, वाढीव विद्यावेतन आणि इतर प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राज्यातील निवासी डॉक्टर्सनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यावेतन वाढ तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सार्वजनिक हॉस्पिटलमधील साडेचार हजार निवासी डाॅक्टरांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून ७ ऑगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. विद्यावेतनाच्या मुद्दयावरून निवासी डॉक्टरांकडून हा बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. तसंच, निवासी डाॅक्टर अत्यावश्यक सेवेत सहभागी होणार नसल्याची माहिती सेंट्रल मार्ड या निवासी डाॅक्टरांच्या संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. यामुळे, रूग्णसेवेवर नक्कीच दुष्परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहेत.

विद्यावेतन वेळेवर मिळत नसून वाढही रखडली

अकोला, अंबेजोगाई, लातूर, नागपूर येथील सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डाॅक्टरांना गेल्या चार महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेले नाही. निवासी डाॅक्टरांचे विद्यावेतन निधीअभावी मिळत नसल्याचे कारण वैद्यकीय महाविद्यालयांकडून देण्यात येत असते. गेल्या वर्षीच्या आॅगस्ट महिन्यापासून विद्यावेतन वाढ रखडली आहे. त्यामुळे, विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये अद्यापही विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. सध्या निवासी डाॅक्टरांना दर महिन्याला केवळ ५३ हजार विद्यावतेन मिळत आहे. यात जानेवारी महिन्यापासून पाच हजारांची वाढ मिळेल, या तोंडी आश्वासनाची पुर्तता अद्याप होत नसल्याचे डाॅ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले. यांसह निवासी डाॅक्टरांना होणारा क्षयरोगाचा संसर्ग, त्यातून त्यावरील उपचाराचा कालावधी, डाॅक्टरांच्या प्रसूती रजा असे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास बेमुदत संप अटळ असल्याचा इशारा डाॅ. डोंगरे यांनी दिला.

“किमान इतर राज्यातील निवासी डाॅक्टरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील डाॅक्टरांना विद्यावेतन हवे. तसेच विद्यावेतनासह इतर मागण्या गेले कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. त्यावरच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय प्रभारी संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांची आम्ही भेट घेतली. १३ आॅगस्टपर्यंत मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पण, प्रलंबित मागण्यांबाबत पूर्वानुभव आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संप पुकारणार आहोत. 
डाॅ. कल्याणी डोंगरे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -