Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत लसीकरण घोटाळा? ३९० जणांना दिली बोगस लस, हाऊसिंग सोसायटीच्या आरोपानं खळबळ

मुंबईत लसीकरण घोटाळा? ३९० जणांना दिली बोगस लस, हाऊसिंग सोसायटीच्या आरोपानं खळबळ

Related Story

- Advertisement -

मुंबईत सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. अशातच मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीनं केलेल्या आरोपानं खळबळ उडाली आहे. मुंबईतील कांदिवली येथे असलेल्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीने आम्हाला बोगस लस दिल्याचा आरोप करत बोगस पद्धतीने लसीकरण सुरु आहे, असा दावा केला आहे. तसंच ज्या रुग्णालयाने लसीकरण केलं त्या रुग्णालयाने आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या घटनेनं लस घेतलेले नागरिक हादरले आहेत. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने नागरिकांच्या हवाल्याने दिलं आहे.

कांदिवली येथील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात ३९० नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस देण्यात आला. राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क करुन शिबिर उपलब्ध करुन दिलं होतं. तर तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती या शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी दिली आहे. ५ लाख रुपये देऊन हे शिबिर आयोजित केलं होतं, असं सोसायटीच्या नागरिकांनी सांगितलं.

- Advertisement -

शिबिरात लस घेतलेल्या नागरिकांनी जी काही माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक आहे. “माझ्या मुलाने लस घेतली. एका डोससाठी १२६० रुपये दिले. पण, लस घेतल्यानंतर आम्हाला कोणताही मेसेज आला नाही. इतकंच नाही, तर आम्हाला लस घेताना फोटो सुद्धा काढू दिले नाही,” असं हितेश पटेल यांनी सांगितलं. याशिवाय, सोसायटीमधील ऋषभ कामदार यांनी लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं आम्हाला दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत. त्यामुळे आम्हाला धक्काच बसला. इतकंच काय तर आम्हाला प्रमाणपत्रही दिली गेली नाही, त्यामुळे आम्ही शोधशोध घेण्यास सुरूवात केली. १०-१५ दिवसानंतर आम्हाला प्रमाणपत्र दिली गेली, असं सांगितलं. दरम्यान, लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचं रुग्णालयांनी स्पष्ट केल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्र

हिरानंदानी इस्टेट सोसायटीमध्ये जे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं, ते कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, लसीकरण झाल्यानंतर जी प्रमाणपत्र देण्यात आली ती प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. नानावटी, लाईफलाईन, नेस्को बीएमसी लसीकरण केंद्रांच्या नावाने ही प्रमाणपत्र होती.

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -