घरताज्या घडामोडीवृक्षप्राधिकरणात बदल करण्याचा संकल्प, महापौर मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

वृक्षप्राधिकरणात बदल करण्याचा संकल्प, महापौर मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

Subscribe

"वृक्षप्राधिकरणात बदल करायचा असल्यास केवळ मुंबई महापालिका करु शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणार आहेत," अशी माहिती त्यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली आहे.

” ‘तौक्ते चक्रीवादळामुळे’ मुंबईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळात अनेकांचा झाडं पडून मृत्यू देखील झाला आहे. यामुळे ज्या कुटुंबात एवमेव कमावणारी व्यक्ती गेल्याने त्यांच्या घरातील सदस्य अनाथ झाले आहे. त्यामुळे आता यापुढे झाडं पडून कोणाचा मृत्यू होणार नाही आणि झाडांपासून देखील ऑक्सिजन मिळेल, अशाप्रकारचे काही बदल करणे गरजेचे आहे. याबाबत काही वृक्षप्रेमींनी महापालिकेला पत्र देखील लिहिली आहे. मात्र, वृक्षप्राधिकरणात बदल करायचा असल्यास केवळ मुंबई महापालिका करु शकणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे पत्र आली आहेत, त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणार आहेत,” अशी माहिती त्यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली आहे.

काय आहे संकल्प?

“चक्रीवादळामुळे गेल्यावर्षी देखील अनेक झाडं पडून अनेकांची घर उद्धवस्त झाली होती. तर काहींची मनुष्यहानी देखील झाली होती. दरम्यान, यावर्षीही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका असून वरळीच्या संगीता खरात यांचा जागीच मृत्यू झाला. या अशा घटना टाळायच्या असल्यास पदपथावर झाडं लावणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे जी झाडं मोठी झाली आहेत, त्यांची वेळेत छाटणी करणे देखील तिकतेच महत्त्वाचे आहे. तसेच वृक्षप्रेमींच्या म्हणण्यानुसार झाडं पडणार नाहीत, अशी झाडं लावण्यात यावीत. मात्र, झाडं ही अशी गोष्ट नाही आहे, की सिमेंटमध्ये लावू शकतो. झाडं आहे ते पडणारच. पण, त्यामुळे मनुष्य हानी होणार नाही, याची दखल घेणे फार गरजेचे आहे”. त्यानुसार, विचार करुन याबाबत लवकरात लवकर महापौर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून याबाबत आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीमध्ये राहणाऱ्या संगीता खरात यांच्या अनाथ मुलांना एक लाखाची मदत केली आहे. तसेच युवासेनेने देखील या दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचला आहे. त्यामुळे ही मदत नाही तर आम्ही आमचे कर्तव्य समजतो”. – किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर


हेही वाचा – तराफा पी-३०५ दुर्घटना प्रकरण: कॅप्टन राकेश बल्लाव, मुख्य अभियंत्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -