घरमुंबईऑनलाईन 'Food Apps'वर एफडीएची नजर!

ऑनलाईन ‘Food Apps’वर एफडीएची नजर!

Subscribe

झोमॅटो, उबेर, फुडपांडा, उबर इट आणि स्विगी अशा सर्वच फूड डिलीव्हरी Apps वर, आता FDAची नजर असणार आहे.

आजकाल ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप्सची मागणी जबरजस्त वाढली आहे. झटपट, हवं ते आणि हवं तेव्हा खायला उपलब्ध व्हावं यासाठी लोकं अशा अॅप्सना पसंती देतात. ही फूड अॅप्स तरुण वर्गाच्या तर गळ्यातील ताईत बनली आहेत. मात्र,  तुम्हाला घरपोच डिलीव्हरी देणारी ही अॅप्स स्वत: जेवण पुरवत नाहीत तर, दुसऱ्या एका विक्रेत्याकडून खरेदी करुन ते ग्राहकांना देतात. हे पुरवलेलं अन्न अस्वच्छ ठिकाणांहून पुरवलं जात असल्याच्या अनेक घटना घडल्यामुळे ‘एफडीएने’ (अन्न आणि औषध प्रशासन) झोमॅटो, उबेर, फुडपांडा आणि स्विगी या ऑनलाईन वेबसाईट्सना नोटीस बजावली होती. दरम्यान एफडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोटीसअंतर्गत नुकतंच २२ ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणाऱ्या अॅप्सवर कारवाई करत, केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. FDA ने एकूण २२ प्रकरणांबाबत नोंद करुन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने ऑनलाईन फूड विक्रीसंदर्भात मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ३४७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात १२२ आस्थापना अन्न सुरक्षा मानद कायद्यांअंतर्गत परवाना आणि नोंदणी नसताना सुरू असल्याची बाब समोर आली. त्यात स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट अशा ऑनलाइन अॅपद्वारे, साइटद्वारे अन्नपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांशी संबंधित आस्थापनांचा समावेश आहे.

- Advertisement -

स्टॉप बिझनेस नोटीस

एफडीएकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेत या कंपन्या विनापरवाना आणि अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे समोर आल्यामुळे, अशा एकूण १२२ आस्थापना विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री करत होते. त्यामुळे त्यांना स्टॉप बिझनेस नोटीस देण्यात आली आहे. त्यासोबतच, विनापरवाना केलेल्या खरेदी-विक्रीच्या तक्रारीखालीही कारवाई करण्यात आली आहे. परवानाधारक – अट क्रमांक १४ नुसार, खरेदी – विक्रीचे परवाना असणं गरजेचं आहे. त्यानुसार, फक्त मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून स्विगी, झोमॅटो, फूडपांडा आणि उबर इट अशा २२ ऑनलाईन फूड डिलीव्हरी आस्थापनांच्या केसेस दाखल झाल्या आहेत. ही प्रकरणं न्यायप्रविष्ट असून सध्या १२२ आस्थापनांना स्टॉप बिझनेस नोटीस देण्यात आली असून २२ प्रकरणं दाखल झाली आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचं सहआयुक्त अन्न आणि औषध विभाग शैलेश आढाव यांनी स्पष्ट केलं आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात राबवलेल्या मोहिमेत जवळपास ३४७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात १२२ आस्थापना अन्न सुरक्षा मानद कायद्यांअंतर्गत परवाना आणि नोंदणी नसताना सुरू असल्याची बाब समोर आली. यात स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाइन अॅपद्वारे,साइटद्वारे अन्नपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांशी संबंधित आस्थापनांची समावेश आहे. त्यानुसार, २२ प्रकरणांवर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील आस्थापनांचा या कारवाईत समावेश आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
– शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), अन्न आणि औषध प्रशासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -