घरमुंबईमुख्य लेखापरीक्षक खात्यात दोन अधिकार्‍यांची वर्णी

मुख्य लेखापरीक्षक खात्यात दोन अधिकार्‍यांची वर्णी

Subscribe

मुंबई महापालिकेतील अनेक निवृत्त अधिकार्‍यांना पुन्हा कंत्राटी पध्दतीवर घेण्यात येणार असून महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यामध्ये अशाप्रकारे दोन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेतील अनेक निवृत्त अधिकार्‍यांना पुन्हा कंत्राटी पध्दतीवर घेण्यात येणार असून महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यामध्ये अशाप्रकारे दोन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे. महापालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. ही रिक्तपदे भरण्यास होणारा विलंब आणि त्यातच अनुभवी अधिकार्‍यांची निर्माण होणारी कमतरता यामुळे अशाप्रकारे सेवानिवृत्त अधिकार्‍यांना कंत्राटी पध्दतीवर नेमणूक करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत आहे.

सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा महापालिकेत कंत्राटीपद्धतीवर

मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील वरिष्ठ पातळीवरील उप मुख्य लेखापरीक्षकांची केवळ ८ पदे आहेत. त्यातील केवळ दोनच पदे भरलेली आहेत. त्यातील लेखापरीक्षा अधिकारी या पदावरील सेवेत वरिष्ठ असलेले अशोक हिवरे आणि भागवत बोरले या अधिकार्‍यांकडे आहे. परंतु, हे दोन्ही अधिकारी अनुक्रमे ३१ मे २०१९ आणि ३१ जुलै २०१९ ला सेवानिवृत्त झाले आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांकडे महापालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यात कनिष्ठ लेखापरीक्षा सहायक तसेच लिपिक आणि शिपाई या पदाच्या नव्याने भरतीचे काम सोपवले आहे. ही कामे अत्यंत जबाबदारीची आणि गोपनीयतेची असल्यामुळे या कामांची सुरुवातीपासून जबाबदारी सांभाळत असल्याने सेवानिवृत्तीनंतरसुध्दा ही कामे त्यांच्याकडून करून घेता यावीत, म्हणून या दोन्ही अधिकार्‍यांची ५ ऑगस्टपासून ६ महिन्यांकरता महापालिकेच्या मानधनावर कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्य लेखापरीक्षक खात्याने घेतला आहे. याबाबतचा प्रस्तात त्यांनी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला असून अशाप्रकारे विविध खात्यांमध्ये सेवानिवृत्त अधिकार्‍यांना कंत्राटीपध्दतीने सामावून घेण्याचे धोरण राबवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून समजते.

- Advertisement -

हेही वाचा – चला भुताटकीचे भांडे फोडुयात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -