बीडीडी चाळीत राहणाऱ्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना घरे फुकट नाहीच, मोजावे लागणार इतके पैसे

politician jitendra awhad announce his first marathi movie shahu chatrapati share video on instagram

बीडीडी चाळीत पोलीस कर्मचारी आणि मराठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात राहतात. या बीडीडी चाळीबाबत एक महत्वपूर्ण बैठकी झाली. या बैठकीत बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फुकट घरे मिळणार मिळणार नाहीत, असा निर्णय झाला आहे. याबाबत माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा – राणा दाम्पत्याने कोर्टाच्या नोटिशीला दिले उत्तर, अटींचा भंग झाला नसल्याचा केला दावा 

मुख्यमंत्र्यांच्या दालनात गृहनिर्माण विभागाची बैठक झाली. या बैठकीला वरळीचे आजी-माजी आमदार उपस्थित होते. बीडीडी चाळीचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे, जे निवृत्त पोलीस कर्मचारी इतकी वर्ष राहतात, त्यांनाही तिथे घरे मिळतील. मात्र, त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतील हे आव्हाडांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता तिथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिथे घर हवे असेल तर लाखो रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने केली – देवेंद्र फडणवीस

बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी बिडीडीमध्ये जे निवृत्त पोलीस कर्मचारी इतकी वर्ष राहतात त्यांना 1 कोटी पाच लाख किंमतीच्या घरासाठी 50 लाख रुपये बांधकाम खर्च एका घरासाठी मोजावा लागणार आहे. आतापर्यंत 2200 पोलीस कर्मचारी निवृत्त झाले. त्यांना तिथे घरे दिली. तसेच या बिल्डिंग बनायला तीन वर्ष लागणार आहेत. मात्र, सगळ्यांना फुकट घर देऊ शकणार नाही, असेही आव्हाडांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना याठिकाणी घर मिळणार आहे. मात्र, त्याासाठी किमान 50 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.