घरताज्या घडामोडीकोरोनाचे इंजेक्शन ब्लॅकने विकणारी सेवानिवृत्त शिक्षिका गजाआड

कोरोनाचे इंजेक्शन ब्लॅकने विकणारी सेवानिवृत्त शिक्षिका गजाआड

Subscribe

कोरोनाचा रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत आल्यावर त्याला देण्यात येणारे टोलसीझुबम हे महागडे इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकणाऱ्या उल्हासनगरातील एका सेवानिवृत्त शिक्षिकेला फूड अँड ड्रग्ज शाखेने सापळा रचून गजाआड केले आहे. यामागे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी वर्तवली आहे.

काल रात्री उल्हासनगरात उच्चभ्रू वसाहत मनिष नगरमध्ये राहणारी नीता पंजवानी ही महिला कोरोनवरील सिपला कंपनीचे टोलसीझुमब ऍक्टरमा-४०० हे ४० हजार ५४५ रुपयांना मिळणारे इंजेक्शन ६० हजार रुपयांना विकत असल्याची माहिती फूड अँड ड्रग्ज खात्याला मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त दक्षता सुनील भारद्वाज, पवनीकर, प्रवीण पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न आणि औषध निरीक्षक निशिगंधा पाष्टे, नितीन अहेर, संदीप नरवणे, कल्याण गुन्हे अन्वेषणचे संज्यू जॉन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एच .मुदगुल यांनी नीता पंजवानी यांच्याकडे बनावट ग्राहक पाठवले. टोलसीझुमब हे इंजेक्शन ६० हजार रुपयात देताना नीता हिला अटक करण्यात आले.

- Advertisement -

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राजेंद्र यड्रावकर यांच्या आदेशानुसार अशी कोरोनावरील इंजेक्शने विकणाऱ्या टोळींना अटक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे इंजेक्शन विदेशातील सिपला कंपनीचे असून त्याचा तुटवडा आहे. कोविड रुग्णालयातील डॉक्टरच्या तपशीला शिवाय ते मेडिकल मधून मिळत नाही. असे असताना या महिलेने हे इंजेक्शन कुठून आणले? यापूर्वी तिने किती इंजेक्शने विकली? तिच्या सोबत कोणकोण सक्रिय आहे? याचा लवकरच पर्दाफाश करण्यात येणार अशी माहिती सुनील भारद्वाज यांनी दिली.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -