घरताज्या घडामोडीमध्य रेल्वे मान्सूनसाठी सज्ज; पावसाळ्यात भायखळा, परळ, दादरसह 24 धोक्याच्या ठिकाणांवर 'या'...

मध्य रेल्वे मान्सूनसाठी सज्ज; पावसाळ्यात भायखळा, परळ, दादरसह 24 धोक्याच्या ठिकाणांवर ‘या’ उपाययोजना करणार

Subscribe

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. परिणामी रेल्वे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेच्या मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचा आढावा घेतला.

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. परिणामी रेल्वे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेच्या मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आलोक सिंग, मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक, रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि सिव्हिल, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग विभागांचे प्रधान विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. (Review of pre-monsoon works by Central Railway General Manager)

अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजना

- Advertisement -

१. पाण्याचे अधिक पंप – २४ धोक्याची ठिकाणे निवडण्यात आली आहेत. या ठिकाणी १६६ पंप दिले जाणार आहेत. रेल्वे १२० हाय पॉवर पंप, १५ सामान्य पंप आणि बृहन्मुंबई महानगरपालिका उर्वरित ३१ पंप पुरवणार आहे. यावर्षी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या 12.5 HP ते 100 HP दरम्यान वाढवली आहे. मुख्य मार्गावर मशीद, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर इ. ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत.

२. सूक्ष्म बोगदा (Micro tunnelling) – मस्जिद, सँडहर्स्ट रोड, दादर-परळ परिसर, माटुंगा-शीव परिसर, कुर्ला कारशेड, टिळक नगर नाला, दिवा आणि कळवा अशा ८ ठिकाणी सूक्ष्म बोगदा (Micro tunnelling) तयार करण्यात आला आहे. ठाणे- कळवा आणि कळवा- मुंब्रा विभागात दोन नवीन ठिकाणी मायक्रो बोगद्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

३. नाल्यांमधीस गाळ काढणे – मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील ११८.४८ किलोमीटर नाल्यांचे गाळ काढणे आणि साफसफाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, त्यापैकी १०२.३९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि सध्या आणखी १६ किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

४. कल्व्हर्टची साफसफाई – मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागांतील ८८ कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत आणि सध्या आणखी १७ कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे. कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार- लोकमान्य टिळक टर्मिनस परिसर आणि टिळक नगर येथे आरसीसी बॉक्स टाकून कल्व्हर्ट वाढीचे काम होते.

५. झाडांची छाटणी – ४३ झाडे छाटण्याचे काम करण्यात आले असून २३ झाडांचे काम प्रगतीपथावर आहे.

६. गाळ काढणे – मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील ६२,००० घनमीटर गाळ साफ करण्याचे आणि काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

७. ट्रॅक उचलणे – ४७.८ किमी ट्रॅक लिफ्टिंगचे नियोजन करण्यात आलेले आहे ते पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

८. घाट विभागात केलेली कामे –

  • टनेल पोर्टलचे – ४५ मीटर
  • ३०० मीटर रॉकफॉल बॅरियर
  • ५०० चौरस मीटर बोल्डर जाळी
  • ४० मीटर कॅनेडियन फेन्सिंग
  • १६० मीटर्स कठड्यांचे स्थिरीकरण.
  • बोगद्यांतील कामे- १८ ठिकाणे

९. रोड अंडर ब्रिज (RUBs) साठी १४ ठिकाणी स्वतंत्र पंप दिले जातील.

१०. काहीही अघटित घडल्यास राखीव दगड आणि दगडी/ वाळूची खडी तयार ठेवली जाईल – ७३०० घनमीटर दगड आणि ३५०० घनमीटर दगडी/ वाळूची खडी राखीव म्हणून तयार ठेवली जाईल.

११. इतर महत्त्वाची कामे प्रगतीपथावर आहेत –

  • प्री-मॉन्सून वॉटर प्रूफ केबल मेगरिंग- जवळजवळ ८३% काम पूर्ण, उर्वरित काम १ आठवड्यात पूर्ण होईल.
  • घाट विभागातील ३१ स्टॅटिक वॉचमन हट येथे सीसीटीव्ही आणि टेलिफोनची तरतूद.
  • २७७ ठिकाणी वॉटरप्रूफ पॉइंट मोटार मशिन प्रदान केल्या आहेत.
  • AWS (ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टम) मॅग्नेट सीलिंगचे काम १५०६ ठिकाणी या महिन्यात पूर्ण केले जाईल.
  • मस्जिद, भायखळा, माटुंगा आणि शीव -कुर्ला भागात फ्लड गेट्स बसवणे.
  • लोकमान्य टिळक टर्मिनस येथील बंटर भवन नाला अतिक्रमण हटवून जोडला जाणार आहे.
  • कर्वे नगर नाला सुधारणेचे काम बृहन्मुंबई महापालिका द्वारे केले जाणार आहे आणि त्याचा खर्च अजमेरा बिल्डर्सकडून वसूल केला जाणार आहे.
  • प्रियदर्शनी, चुनाभट्टी येथे जलवाहिन्यांच्या खाली साठलेले काँक्रीट साफ करण्याच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती.

१२. ओएचई (OHE) – ओव्हरहेड इक्विपमेंट वायर- थर्मोग्राफिक तपासणी १२३९ ट्रॅक किमी वर पूर्ण झाली आहेत. कंडक्टर आणि ओएचई (OHE) च्या इतर भागांची थर्मो व्हिजन कॅमेरा तपासणी पूर्ण झाली आहे.

१३. २४X७ नियंत्रण कक्ष – मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय, चोवीस तास कार्यरत, सतत देखरेख आणि सतत अपडेटसाठी हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पूरप्रवण भागात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांशी निकट संपर्क ठेवेल.

१४. पावसाळ्याच्या कालावधीत नियंत्रण कार्यालयाकडून क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून पाऊस आणि ट्रॅकच्या वरच्या पाण्याच्या पातळीचे प्रत्येक तासाला निरीक्षण केले जाते.

१५. राज्य सरकार, बृहन्मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका सोबत जवळचा समन्वय- रेल्वे आणि राज्य अधिकारी यांच्यात नियमित बैठका, महापालिका आयुक्त/ अपर महापालिका आयुक्त/मुख्य अभियंता यांच्यासोबत आतापर्यंत ४ बैठका झाल्या आहेत. रेल्वे आणि बृहन्मुंबई महापालिका आपत्ती निवारण केंद्र, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका दरम्यान हॉटलाइन देखील तयार केली आहे.


हेही वाचा – भाजप मुंबई अध्यक्षांनी शेअर केला व्हिडिओ, दंगलीस चिथावणी देणाऱ्या शेलारांच्या अटकेची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -