घरमनोरंजनSushant Sucide Case : रिया चक्रवर्ती कुटुंबियांसह पसार?

Sushant Sucide Case : रिया चक्रवर्ती कुटुंबियांसह पसार?

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत तपासासाठी आगमन केले आहे. सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहार पोलिसांकडे गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणी बिहारमधील पोलीस मुंबई दाखल झाले आहेत. काल त्यांनी रियाची चौकशी करण्याकरता तिच्या मुंबईतील घराकडे गेले असता रिया तिथे नसल्याचे त्यांना आढळून आले. तर रिया ही तिच्या कुटुंबियांसह ३ ते ४ दिवसांपूर्वीच घरातून निघून गेल्याचे रिपब्लिक वर्ल्डने दिलेल्या वृत्तातून समोर येत आहे.

रिया घरी नसल्याचे समजताच पोलिसांनी इमारतीच्या मॅनेजर आणि अन्य सदस्यांकडे रियाची चौकशी केली. यात रिया काही दिवसांपूर्वीच मध्यरात्री कुटुंबीयांसोबत घर सोडून गेल्याचे इमारतीच्या मॅनेजरने सांगितले. दोन-तीन दिवसांपूर्वीच रिया मध्यरात्री तिच्या कुटुंबीयांसोबत घर सोडून गेली. यावेळी त्यांच्याकडे मोठ-मोठ्या बॅग्सदेखील होत्या. ते एका निळ्या रंगाच्या गाडीतून निघून गेले. सुशांत अनेक वेळा रियाच्या घरी यायचा. मात्र आत्महत्या करण्याच्या काही काळापूर्वी त्याचे येणे-जाणे कमी झाले होते, असेही त्या मॅनेजरने सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी राजकारण तापले असून बिहार पोलिसांनी आक्रमक तपास सुरू केला असताना हा तपास सीबीआयकडे देण्यावरून राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायचा नाही, यावर एकमत झाल्याचे समजते.

हेही वाचा –

GoodNews! भारतामध्ये Covid 19 लसीच्या मानवी चाचणीस DGCI ची मंजुरी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -