Sushant Sucide Case: रियाने मुंबईत घेतले २ फ्लॅट्स, ईडी करणार रियाची चौकशी

सुशांतच्या आत्महत्येपूर्वी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत.

rhea chakraborty sushant singh rajput
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फ्लॅट मुंबईच्या खारमध्ये आहेत. याप्रकरणाची ईडी चौकशी करणार असल्याचे ‘इंडिया टुडे’च्या वृत्ता नमूद करण्यात आले आहे.

पैसे आले कुठून?

रिया चक्रवर्तीला करिअरमध्ये फारसे यश मिळालेले नाही. तरी देखील तिने सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी मुंबईत दोन फ्लॅट कुठून खरेदी केले. एवढे पैसे रियाकडे कुठून आले, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खार परिसरात अनेक उच्चभ्रु नागरिक राहत असून येथील जागेच्या आणि घराच्या किंमती देखील प्रचंड आहेत. त्यामुळे इतका पैसा रियाकडे कसा आला?, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता ईडी रियाची चौकशी करणार असल्याचे म्हटले जात आहे.

ED ने फेटाळणी मागणी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्ती हिची आज (ED) ईडीकडून चौकशी होणार आहे. मात्र रियाने तिच्या वकिलांमार्फत ही चौकशी पुढे ढकलण्याची मागणी ईडी केली आहे. सुप्रिम कोर्टातील सुनावणीचा निर्णय येईपर्यंत ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती तिने केली. परंतू ईडीने तिची ही मागणी फेटाळली आहे.


हेही वाचा – Sushant Sucide Case : रियाची मागणी ED ने फेटाळणी; चौकशी आजच होणार