घरताज्या घडामोडीRhea Chakrabory सह ६ आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी!

Rhea Chakrabory सह ६ आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास दररोज वेगवेगळ्या वळणांवर जात असताना त्यादरम्यान सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. Rhea Chakraborty आणि तिचा भाऊ Showik Chakraborty यांच्यासह एकूण ६ आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची कोठडी आज संपत होती. यासाठी आज पुन्हा न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली असता त्या सर्व ६ जणांची रवानगी ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. रिया आणि शोविकसोबतच सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि बासित परिहार यांना देखील न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या सगळ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर येत्या २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

Sushant Singh Rajput Death प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईत आणि बॉलिवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक नवनवे खुलासे आणि दावे केले जात आहेत. सुशांत प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद कंगना रनौत, रिया चक्रवर्ती, बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन असं करता करता दीपिका पदुकोनच्या व्हॉट्सअॅप चॅटपर्यंत येऊन पोहोचला आहे. अजूनही सुशांतची हत्या झाली होती की आत्महत्या आणि आत्महत्या होती तर ती का? हे मूळ प्रश्न अनुत्तरीतच असून कंगना रनौतच्या वेगवेगळ्या आरोपांमुळे बॉलिवुडमधलं ड्रग्ज कनेक्शन चर्चेत आलं आहे. आता यासंदर्भात अभिनेत्री दीपिका पदुकोनचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं असून त्यातून दीपिकालाही NCB समन्स जारी करण्याची शक्यता आहे.


वाचा सविस्तर – दीपिका पदुकोणचे ड्रग्ज Chat viral; धक्कादायक माहिती आली समोर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -