घरमुंबईकेडीएमसीचे 32 कोटी पाण्यात कि खड्डयात ?

केडीएमसीचे 32 कोटी पाण्यात कि खड्डयात ?

Subscribe

नगरसेवकाचा आयुक्तांना सवाल,कंत्राटदाराला बील अदा करू नये , नगरसेवक वामन म्हात्रे यांची मागणी

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे व चर भरण्यासाठी 32 कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कुठले खड्डे भरले ? महापालिकेचे कोट्यवधी रूपये पाण्यात कि खड्डयात गेले ? असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला असून, संबधित कंत्राटदाराच्या कामाची पडताळणी करावी अन्यथा बिल देऊ नये अशी मागणी म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. त्यामुळे केडीएमसीतील खड्डयांचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यावरील खड्डे व चरी भरण्यासाठी स्थायी समितीत खड्डे भरण्यासाठी 17 कोटी तर चरी भरण्यासाठी 15 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर होतात. मात्र प्रत्यक्षात खड्डे भरले असतील तर आजची रस्त्यांची परिस्थिती काय आहे ? असा सवाल म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या कामांची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नये. ज्या ठेकदारांना खड्डे भरण्याचे काम दिले होते त्याच ठेकेदारांनी चरी भरण्याचे काम केले आहे का ? आपले पैसे खड्डयामध्ये गेले आहेत की, पैशांमध्ये खड्डे गेलेले आहेत, तेच कळत नाही. त्यामुळे त्या ठेकेदारांना बिल अदा करू नये. आणि जर बिल अदा केले असेल तर त्यांनी केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी व अशा ठैकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. हे चक्र वर्षोनुवर्षे सुरू असून तेच ठेकेदार आणि तेच अधिकारी आहेत का ? याचीही सखोल चौकशी करावी, अशीही मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -