Eco friendly bappa Competition
घर मुंबई टक्केवारीच्या अर्थकारणामुळे रस्ते खड्ड्यात

टक्केवारीच्या अर्थकारणामुळे रस्ते खड्ड्यात

Subscribe

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे स्मार्टसिटीच्या यादीत असलेल्या ठाणे शहरांसह संपूर्ण जिह्यामध्ये सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे स्मार्टसिटीच्या यादीत असलेल्या ठाणे शहरांसह संपूर्ण जिह्यामध्ये सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे झालेल्या अपघातात कल्याण-डोंबिवली परिसरात पाच जणांनी आपले प्राण गमावले. नागरिकांचे जीव जात असल्यामुळे पालिकेवर टीकेचा वर्षाव होत आहे.

टक्केवारीच्या अर्थकारणामुळेच ठाण्यातील रस्ते खड्ड्यात गेले असल्याचा आरोप ठाणेकरांनी केला आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेने लागलीच खड्ड्यांचा सर्व्हे केला आहे. 14 जुलैपर्यंत केलेल्या सर्व्हेत खड्ड्यांची संख्या 947 असल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वाधिक खड्डे हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये आहेत. माजिवडा मानपाड्याच्या परिसरात 190 खड्डे आहेत. त्यानंतर वर्तकनगर परिसरात 165 तर दिवा परिसरात 135 खड्डे आहेत. विशेष म्हणजे शहरात जरी खड्ड्यांचे क्षेत्रफळ कमी असले तरी दिवा परिसरात मात्र 6 हजार 394 चौरस मीटर परिसरात खड्डे पडले असल्याचे या सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत 654 खड्डे बुजवण्यात आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये द्रुतगतीमार्गावरील खड्ड्यांचा सर्व्हे करण्यात आला नाही. केवळ ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील खड्डे मोजण्यात आले आहे. शहरात अजूनही 289 खड्डे असून ते बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ब्रिक्स अ‍ॅण्ड सॅण्ड मिश्चर सारख्या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून हे खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती ठामपा शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली आहे.

   

- Advertisement -

ठाण्यात पहिल्यांदाच सिरॅमिक केमिकलच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी रेडीमिक्सच्या माध्यमातून खड्डे बुजविले जातील, पुढील आठ ते दहा दिवसात ठाण्यातील खड्डे बुजवण्यात येतील – एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे

रस्त्यांच्या दुरावस्थेला संबंधित महापालिकाच जबाबदार आहे. यामुळे जर अपघात झाला आणि जीवित हानी वा वाहनांचे नुकसान झाले तर त्याला महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनाच जबाबदार धरले जावे. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय यापुढे पर्याय नाही. पावसाळा गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असा प्रकार यापुढे होऊ देता कामा नये. – मनिष वाघ,सदस्य,पर्यावरण दक्षता समिती

- Advertisment -