घरमुंबईरोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण ,कोकण रेल्वे आणखी सुसाट

रोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण ,कोकण रेल्वे आणखी सुसाट

Subscribe

सुमारे ४७ किमी अंतरासाठी ५३० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

कोकण रेल्वेने हाती घेतलेला रोहा ते वीर दरम्यानच्या दुपदरीकरणाचा मार्ग पूर्ण झाल्याने आता कोकण रेल्वे अधिक धावणार आहे. सुमारे ४७ किमी अंतरासाठी ५३० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे आता वीरपर्यंत वेगवान गाडीला मार्ग देण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे कोकणकडे जाण्याचा मार्ग जवळपास २० मिनिटांनी कमी होईल, अशी शक्यता आहे.

कोकणाकडे जाणार्‍या या रेल्वेच्या रोहा स्टेशनपर्यंत दुहेरी मार्ग उभारण्यात आला आहे. रोहा ते वीर हा सुमारे ४७ किमी अंतराच्या मार्गाचे काम रेल्वेने हाती घेतले होते. या कामाची पूर्तता नुकतीच झाली. दुहेरी मार्गामुळे कोकण रेल्वेमार्गातील वीरपर्यंतची कोंडी सुटणार आहे. यामुळे प्रवासातील वेळही वाचेल. दुपदरीकरणाचा हा मार्ग ठोकूरपर्यंतचा निश्चित करण्यात आला आहे. हे अंतर सुमारे ७०० किलोमीटरचे आहे. यातील पहिल्या टप्प्यातील हा मार्ग लवकरच खुला होईल, असे कोकण रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

पनवेलपासून सुरू होणारी कोकण रेल्वे ठोकूरपर्यंत आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोहा ते कोकण रेल्वेच्या वीरपर्यंत ४६.८ कि.मी. अंतराचे दुपदरीकरणाचे काम ३० ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. पूर्ण झालेल्या या कामामुळे वेगवान गाडीला मार्ग करून देण्याची आवश्यकता भासणार नाही. परिणामी कोकणात जाण्यासाठीच्या वेळेतही बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -