घरमुंबईआंदोलनाच्या दिवशी कोयत्याने रोहनवर वार

आंदोलनाच्या दिवशी कोयत्याने रोहनवर वार

Subscribe

रोहन तोडकर हा तरुण मराठा आरक्षण आंदोलनात बळी गेल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

रोहन तोडकर हा तरुण मराठा आरक्षण आंदोलनात बळी गेल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात मात्र त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. आंदोलन संपले म्हणून सहज मित्रांबरोबर बाहेर पडलेल्या रोहन तोडकरला ग्रामस्थांनी ठार मारले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून रोहनची हत्या झाल्याचे जाहीर केले नाही. गुरुवारी रोहनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आणि त्यानंतर तो अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी सातार्‍यात नेण्यात आला.

मुळचा सातारा जिल्ह्यात राहणारा रोहन तोडकर (१९) हा कोपरखैरणे सेक्टर १५ मध्ये शंकर शिंदे (मामा) यांच्याकडे राहत होता. रोहन बुधवारी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सकाळीच घरातून बाहेर पडला. त्यानंतर आंदोलन स्थगित झाल्यावर घरी आला. संध्याकाळी तो जेवण करून पुन्हा घराबाहेर पडला. त्याच सुमारास कोपरखैरणे विभागात आंदोलन हिंसक झाले. पोलिसांनी लाठीमार केला.  बाहेर परिस्थिती चिघळली असल्यामुळे ग्रामस्थांनी रोहनला घरात घेतले . त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने १० ते १२ वार केले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला बाहेर सोडून देण्यात आले.

- Advertisement -

हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला असता त्याला तत्काळ उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. खूप वेळ झाला तरी रोहन घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्याचवेळी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांकडूनही काही माहिती मिळाली नसल्याचे रोहनचे मामा शिंदे यांनी सांगितले.अखेर दुसर्‍या दिवशी पोलिसांनी घटनेची माहिती शिंदे यांना दिली असता त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. मात्र रोहनचा मृत्यू झाला.  रोहनच्या मृत्यूने पुन्हा तणाव वाढू नये यासाठी कोपरखैरणे,घणसोली परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.  मुख्यमंत्र्यांनी रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आश्वासन दिले असल्याची माहिती शाशिकांत शिंदे यांना दिली. त्यानंतर जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करून रोहनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

 व्हॉट्स अ‍ॅपवरून दिलेला संदेश

कोपरखैरणे येथे २५ जुलै रोजी मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी जखमी रोहन दिलीप तोडकर (वय १९) हा सातारा जिल्ह्यातील पाटन तालुक्यातील चपलखोनोली येथील मूळ रहिवासी आहे. तो कोपरखैरणे सेक्टर १५ येथे जखमी झाला होता. त्याला नवी मुंबईच्या पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होेते. कोपरखैरणे गावात त्याच्यासह आणखी काही जणांवर हल्ला झाला होता. त्यावेळी रोहन जखमी झाला. २५ जुलैला रात्री त्याला डॉक्टरांनी जे. जे. हॉस्पिटलला हलवले. उपचार सुरू असताना तिथे त्याचा मृत्यू झाला. कौपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२ आणि दंगलीच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. याविषयीचा तपास सुरू आहे. रोहनचा मृतदेह सातारा येथील त्याच्या मूळगावी पाठवण्यात आला असून तिथे शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 
-हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -