….रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला

Rohit Pawar gave political advice to Raj Thackeray
Rohit Pawar gave political advice to Raj Thackeray

मनसेने भाजपच्या जवळ जाणारी भूमिका घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यविरोधात आंदोलन छेडले आहे. या पाश्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी राज ठाकरेंना एक सल्ला दिला आहे. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, दुसऱ्या पक्षाचे ऐकून ते भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून देऊ नये. ती त्यांनी जपली पाहिजे, असे माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटते, असे रोहीत पवार म्हणाले.

मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले. उद्धवजी हे राज ठाकरे यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा ते त्यांच्या जास्त जवळ राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहिती असाव्यात. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असे रोहीत पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्या डोक्यात केमिकल लोच्या झाल्याचे उद्धव यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादिच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून रोहीत पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली. भाजपने राजकारणाचा स्तर घालवला आहे. ता किमान महाराष्ट्राची संस्कृती तीर घालवू नये. पुण्यातील मरहाण प्रकरणाची चौखशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस मोठे नेते आहेत. आपण आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल अशी अपेक्षा होती. मात्र, आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आहे. राज्याच्या संस्कृतीला हे कधीही न शोभणारे आहे, असेही रोहीत पवार म्हणाले.