घरताज्या घडामोडीNirbhaya Squad: रोहित शेट्टीचा मुंबई पोलीसांच्या निर्भया स्क्वॉडसाठी स्पेशल व्हिडीओ, एकदा...

Nirbhaya Squad: रोहित शेट्टीचा मुंबई पोलीसांच्या निर्भया स्क्वॉडसाठी स्पेशल व्हिडीओ, एकदा नक्की पाहा

Subscribe

निर्भया पथकाच्या या स्पेशल व्हिडीओला सेलिब्रेटींनी देखील पसंती दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडीओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज, लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आपल्या जबरदस्त अँक्शन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. रोहित शेट्टी सिनेमात अँक्शनसोबतच एक सामाजिक संदेश देखील देत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray )  हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे (Nirbhaya Squad)  उद्धाटन करण्यात आले असून 103 हा फोन क्रमांक लाँच करण्यात आला आहे.  रोहित शेट्टीने मुंबई पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या या निर्भया पथकासाठी एक खास व्हिडीओ तयार केला.  मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केल्या असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई पोलिसांनी रोहित शेट्टीने तयार केलेला व्हिडीओ शेअर करत आकर्षक कॅप्शन दिले आहे. ‘लंघ के अब तू लक्ष्मण रेखा, बन निडर बन निर्भया! निर्भय महिला,मुंबईचा ट्रेडमार्क आणि आता एक समर्पित पथक जे या शहारातील महिलांमधील निर्भयाचे प्रतिबिंब आहे’, असे म्हटले आहे.

- Advertisement -

निर्भया पथकाच्या या स्पेशल व्हिडीओला सेलिब्रेटींनी देखील पसंती दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडीओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज, लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.

निर्भया पथकाविषयी

निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. तक्रार नोंदवून पोलीस योग्य कार्यवाही करत आहेत हे साकीनाका घटनेवरून दिसले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भय पथके काम करणार असून मुंबईतील 91 पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे

- Advertisement -

हेही वाचा – Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्भया पथकाचे उद्घाटन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -