घरमुंबईकॉलेज विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी कक्ष

कॉलेज विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी कक्ष

Subscribe

युजीसीचे विद्यापीठांना आदेश

देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाचे धडे घेणार्‍या विद्यार्थिनीचा सुरक्षा लक्षात घेऊन केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा नुकतीच केली आहे. या निर्णयानुसार देशभरातील विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये उच्च शिक्षणाचे धडे घेणार्‍या विद्यार्थिनी सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची सूचना युजीसीने दिली आहे. त्यानुसार कॉलेजांतील विद्यार्थिनींच्या आणि महिलांच्या तक्रार निवारण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथीर्नींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी युजीसीने पुढाकार घेतला आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिला कर्मचार्‍यांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना रोखण्याचा निर्णयही युजीसीने घेतला आहे. कॉलेजांत किंवा विद्यापीठात तक्रार निवारण समिती आणि विशेष कक्षाचे स्थापन करण्याचे निर्देश युजीसीनी दिले आहेत. युजीसीने 2015 मध्ये विद्यार्थीनी आणि कर्मचार्‍यांसाठी आखून दिलेल्या नियमांच्या अखत्यारितीमध्ये हा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महाविद्यालयांमध्ये समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. तरीही कामाच्या ठिकाणी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत युजीसीने सर्व विद्यापीठांना पत्र पाठविले आहे. तसेच महिलांना लैंगिक अत्याचारसंदर्भात तक्रार करण्यासाठी 1800111656 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठांत काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचे वृत्त समोर आले होते. तर मुंबई विद्यापीठ संलग्नित अनेक कॉलेजांमध्ये विद्यार्थी सुरक्षा वार्‍यावर होती. त्यामुळे आता युजीसीने घेतलेल्या निर्णयामुळे आता विद्याीर्थी सुरक्षेचा प्रश्न येणार नाही, अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लवकरात लवकर या केंद्राची अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. हे आदेश देताना युजीसीने हेल्पलाईन क्रमांक देखील दिल्याने विद्यार्थिनींना त्याचा फायदा होईल, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -