भारतीय पोशाख सर्व पोशाखांमध्ये सुंदर आणि सभ्य असतो असं म्हटलं जातं. जोपर्यंत तुम्ही भारतीय पोशाखासोबत सुंदर दागिने घालत नाही तोपर्यंत तुमचा लूक पूर्ण होत नाही. खरंतर, भारतीय लूकसह ॲक्सेसरीज घातल्याने तुमचा लूक आणखी सुंदर दिसतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही स्वत:ला काही खास लूक देण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊयात काही रॉयल कुंदन नेकपीस डिझाइन विषयी.
स्टोन कुंदन नेकपीस :
![Royal Kundan Neckpieces : Best royal kundan neckpieces on ethnic wear](https://www.mymahanagar.com/wp-content/uploads/2025/01/Tanvi-2025-01-03T122422.983-1024x666.jpg)
सारा अली खानचा कलरफुल स्टोन चोकर कुंदन नेकपीस अतिशय आकर्षक लूक देत आहे. तिने हलक्या गुलाबी रंगाच्या सिक्विन वर्कच्या लेहेंग्यासोबत याला पेअर केलं आहे. या नेकपीसमुळे तिचा लूक रॉयल दिसतोय. तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी असे स्टोन कुंदन नेकपीस मिळू शकतात.
बीडेड कुंदन नेकपीस :
![Royal Kundan Neckpieces : Best royal kundan neckpieces on ethnic wear](https://www.mymahanagar.com/wp-content/uploads/2025/01/Tanvi-2025-01-03T121428.908-1024x666.jpg)
निळ्या आणि पांढऱ्या दगडांनी जडवलेला मणी असलेला कुंदन नेकपीस घालून तुम्हाला राजेशाही लूक मिळवता येईल. सिल्कच्या साडीसोबत या प्रकारचा नेकपीस खूप सुंदर लूक देतो. या प्रकारात मीनाकारी वर्क केले जाते . या प्रकारातले नेकपीस घातल्यानंतर त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही. लग्नाच्या सीझनमध्ये या प्रकारचा चोकर स्टाइल नेकपीस तुम्ही कॅरी करू शकता.
मोत्याचे मणी असलेले कुंदन :
![Royal Kundan Neckpieces : Best royal kundan neckpieces on ethnic wear](https://www.mymahanagar.com/wp-content/uploads/2025/01/Tanvi-2025-01-03T122407.479-1-1024x666.jpg)
आजकाल कुंदन नेकपीससह मोत्याचा हा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. कोणत्याही साध्या भारतीय पोशाखात हे परिधान करून तुम्ही स्वतःला सुंदर लूक देऊ शकता. असे कुंदन स्टाईल नेकपीस तुम्ही लेहेंगा आणि साडी या दोन्हीसोबत परिधान करू शकता. यासह हाय बन हेअरस्टाईल तुमचा लुक वाढवेल. तुम्हाला असे नेकपीस 1000 ते 2000 रुपयांच्या रेंजमध्ये ऑनलाइन मिळू शकतील. या नेकपीसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारच्या आउटफिटसह स्टाइल करू शकता अगदी वेस्टर्न आऊटफिट्सवरही.
गोल्ड प्लेटेड पारंपरिक चोकर :
![Royal Kundan Neckpieces : Best royal kundan neckpieces on ethnic wear](https://www.mymahanagar.com/wp-content/uploads/2025/01/Tanvi-2025-01-03T122344.485-1024x666.jpg)
जर तुम्हाला स्वतःला पारंपरिक लूक द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा गोल्ड प्लेटेड कुंदन चोकर वापरून पाहू शकता. वेगवेगळ्या रंगात हे दगड तुम्हाला बाजारात सहज मिळतील. तुमच्या साडी किंवा लेहेंग्याशी स्टाइल करून तुम्ही स्वतःला सुंदर बनवू शकता. तुम्हाला हे 1000 ते 1500 रुपयांच्या रेंजमध्ये ऑनलाइन देखील मिळेल.
हेही वाचा : Milk Cream : दुधाची साय चेहऱ्यावर लावण्याचे फायदे
Edited By – Tanvi Gundaye