घरमहाराष्ट्रनाशिक८ हजार कृषीग्राहकांकडे २८९ कोटी रुपये थकबाकी; महावितरण करणार 'ही' मोठी कारवाई

८ हजार कृषीग्राहकांकडे २८९ कोटी रुपये थकबाकी; महावितरण करणार ‘ही’ मोठी कारवाई

Subscribe

नाशिक : वारंवार थकीत देयकाची रक्कम भरण्यासाठी आवाहन करून, तसेच ही रक्कम भरण्यासाठी विविध योजना आखूनही महावितरणच्या आवाहनास अजीबात प्रतीसाद न देणार्‍या पाच वर्षाहून अधिक काळापासून देयक थकवणार्‍या आणि ज्या कृषी ग्राहकांचा मंजूर जोडभार ७.५ अश्वशक्ती पेक्षा अधिक आहे अशा कृषी ग्राहकांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम कोकण प्रादेशिक विभागासह नाशिक परिमंडळात सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती महावितरणचे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.

नाशिक परिमंडळात येणार्‍या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील ८ हजार ३५६ शेतकर्‍यांनी २८९ कोटी ३१ लाख ९१ हजार रुपये थकवले आहे. महावितरण कडून आवाहन करूनही प्रतीसाद न मिळाल्याने या शेतकर्‍यांच्या विरोधात महावितरण प्रशासनास नाईलाजाने वीज पुरवठा खंडित कारण्याची कारवाई करावी लागणार आहे. नाशिक परिमंडळात ५ ते १० वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या ५ हजार ७८ असून, या ग्राहकांकडे १६४ कोटी ११ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांमध्ये ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे ३ हजार ७९४ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे १ हजार १४७ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या १३७ आहे. १० ते १५ वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या २ हजार ४३७ असून, या ग्राहकांकडे ९० कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणारया शेतकर्‍यांमध्येे ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे १ हजार ९२२ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे ४८७ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या २८ आहे.

- Advertisement -

१५ वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या ८४१ असून, या ग्राहकांकडे ३४ कोटी ३३ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्या शेतकर्‍यांची संख्या पुढीलप्रमाणे ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे ६८० ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे १४८ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍यांची संख्या १३ आहे. अशी एकूण नाशिक परिमंडळात ५ ते १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणार्‍या कृषी ग्राहकांची संख्या ८ हजार ३५६ असून, या ग्राहकांकडे २८९ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये अश्वशक्तीनुसार कृषीपंपाचा वापर असणार्‍या शेतकर्‍यांमध्ये संख्या पुढीलप्रमाणे ७.५ ते १० अश्वशक्ती असणारे ६ हजार ३९६ ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे १ हजार ७८२ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणार्‍याची संख्या १७८ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -