घरमुंबईआयएनटी स्पर्धेत रुईयाचे 'एकादशावतार' ठरले सर्वोत्कृष्ट

आयएनटी स्पर्धेत रुईयाचे ‘एकादशावतार’ ठरले सर्वोत्कृष्ट

Subscribe

इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) अर्थात प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत रुईयाचे 'एकादशावतार' ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे. तर दुसरे पारितोषिक गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या 'रंगबावरी' या एकांकिकेला मिळाले असून तिसरे पारितोषिक मुलुंडच्या 'सेल्फी मग्नता एकांकिके'ने पटकावले आहे.

कॉलेज विश्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यसृष्टीतील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी) अर्थात प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ‘एकादशावतार’ या एकांकिकेने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर ‘रंगबावरी’ला दुसर आणि ‘सेल्फी मग्नता’ एकांकिकेला तिसरे पारितोषिक मिळाले आहे. ‘एकादशावतार’ ही एकांकिका माटुंगा येथील रुईया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.

रुईयाने पटकाले सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकाचे पारितोषिक

रुईयाने सादर केलेल्या एकांकिकेच्या पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकाचे देखील पारितोषिक पटकावले आहे. गुरुवारी रात्री उशीराने जाहीर झालेल्या निकालात गोन्सालो गार्सिया कॉलेजची ‘रंगबावरी’ द्वितीय तर मुलुंडच्या वझे कॉलेजने सादर केलेली ‘सेल्फी मग्नता’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी रात्री उशीरा संपन्न झाला. अंतिम स्पर्धेत रुईया, वझे, डहाणूकर, टी.के.टोपे नाईट कॉलेज आणि गार्सिया कॉलेज यांनी सादरीकरण करत अभिनय सादर केला. यंदा या स्पर्धेत एकूण २९ कॉलेजने भाग घेतला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १० कॉलेजच्या एकांकिका पात्र ठरल्या होत्या. त्यात रुईयाच्या ‘एकादशावतार’ या एकांकिकेला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आल्यानंतर एकच जल्लोषाचे वातावरण पहाय/ला मिळाले. प्राजक्ता देशमुख हिने या एकांकिकेच्या लेखनाची तर रणजित पाटील यांनी दिग्दर्शकाची यशस्वी भूमिका बजावित पारितोषिक देखील पटकाविले.

- Advertisement -

रंगबावरी एकांकिका

रुईया कॉलेज पाठोपाठ गोन्सालो गार्सिया कॉलेजने सादर केलेली रंगबावरी ही एकांकिका यंदाच्या या स्पर्धेत दुसरी आली आहे. तर या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसह सर्वोत्कृष्ट संगीतासाठी पारितोषिक आपल्या नावे करीत प्रेक्षकांची मने जिंकली. अमोल फडके आणि जयेश सुहास यांनी अनुक्रमे प्रकाशयोजना आणि संगीताची धुरा सांभाळली होती. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब ‘सेल्फी मग्नता’ या एकांकिकेच्या तेजस राऊत यांने पटकाविला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक याच एकांकिकेच्या पूजा मिठबावकर हिने पटकावित वझे कॉलेजच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी इतर अनेक कलाकारांना प्रशस्तीपत्रक देऊन गौऱविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -