घरताज्या घडामोडीदादर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण

दादर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाला आहे. कमी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा डोक वर काढत आहे. मात्र राज्यातील जनतेला याचा काही फरक पडत नसल्याचे चित्र दिसून येते. मुंबईत हजारो नागरिक सतत ये जा करत असतात. मुंबईतीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. नागरिक कोणतीही फिकीर न करता विनामास्क फिरताना दिसत आहेत. मुंबईतील वाढती कोरोना संख्या पाहता महानगरपालिका आयुक्त सतत नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. मात्र मुंबईच्या दादर मार्केटमध्ये नागरिकांना कोरोनाच्या नियमांचा विसर पडलेला दिसतो आहे. दादार मार्केटध्ये रोज मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकरांना कोरोनाचा विसर पडला आहे का असा प्रश्न पडला आहे.

दादर फुल माक्रेटमध्ये रोज फुले, भाज्या घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. दादर मार्केट आणि दादर स्टेशन परिसर मध्यवर्ती आणि सोयीचे असल्याने नागरिकांची मोठी गर्दी या परिसरात असते. नागरिकांची मोठी गर्दी पाहून ते पुन्ह कोरोनाला आमंत्रण देत आहेत असे म्हणायला हरकत नाही. दादर मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून येत नाही. लोकांनी मास्क घातले आहेत मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांनी ७०० ते ८००चा टप्पा पार केला होता. हीच रुग्णसंख्या आता १ हजार ते १३०० इतकी झाली आहे. दादर परिसर आणि दादर मार्केट त्याचप्रमाणे इतरही ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी अशाप्रकारची गर्दी होत आहे. मुंबईत जर अशाप्रकारे कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली तर मुंबईतही अंशत:  लॉकडाऊन किंवा काही प्रमाणात निर्बंध घालावे लागतील असे, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. राज्यात दरदिवशी कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नागपूरात घालून दिलेल्या नियम मोडणे नागपूरकरांना महागात पडणार आहे.


हेही वाचा – Corona In Maharashtra: लग्नसराई, लोकलमुळे वाढला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव – केंद्रीय पथक 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -