गेल्या दोन दिवसांत सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकारांच्या निधनाची बातमी येत आहे. त्यामुळे आधीच शोकाकूल वातावरणात असलेल्या बॉलीवूड कलाकारांसंबंधी आता ना ना प्रकारच्या अफवा कुठू लागल्या आहेत. इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन महान कलाकारांनी लागोपाठ या जगाचा निरोप घेतला. त्यातच ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. मात्र या बातमीत कोणतेही तथ्य नसून आपण एकदम ठणठणीत आहोत आणि घरात बसून लॉकडाऊनचे पालन करत आहोत, अशी माहिती स्वतः नसिरूद्दीन शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली.
दोन दिवसांत दोन कलाकारांची एक्झिट
२९ एप्रिल रोजी अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. त्यांना २८ एप्रिलला रात्री आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २९ च्या रात्री ऋषी कपूर यांची तब्येत खालावली. त्यांनाही मध्यरात्रीच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र ३० एप्रिलला सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लागोपाठ दोन दिवसांत दोन कलाकारांच्या अशा अचानक जाण्याचे बॉलीवूलडा धक्का बसला आहे. या बातमीतून सावरतो न सावरतो तेच नसिरुद्दीन शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या बातम्या आज सायंकाळी सोशल मीडियावर येऊ लागल्या. परंतू या केवळ अफवा असून यांवर विश्वास ठेऊ नये, असे ट्विट नसिरूद्दीन शहा यांनी केले आहे.
Pray for Nasiruddin shah His condition is serious From 2 days he was Not well…I pray for him that he will get well soon… pic.twitter.com/WGS80A4FIr
— Arshad Ansari (@ArshadA00892094) April 30, 2020