Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई शिक्षक भरतीअभावी रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थी तासिकांपासून वंचित

शिक्षक भरतीअभावी रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थी तासिकांपासून वंचित

माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालयामध्ये स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रम तसेच अन्य अभ्यासक्रमांसाठीचे आवश्यक शिक्षकच नसल्याने महाविद्यालयामध्ये ऑनलाईन तासिकांना सुरुवातच झालेली नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून वारंवार महाविद्यालयाकडे विचारणा करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

सर्वच महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांचे ऑनलाईन तासिका सुरू होऊन 20 दिवस उलटले. मात्र शिक्षक भरती न केल्यामुळे माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालयातील स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रमाचे द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी अद्यापही ऑनलाईन तासिकेपासून वंचित असल्याचे उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असूनही ऑनलाईन तासिका होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये 1 जुलैपासून ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालयामध्ये स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रम तसेच अन्य अभ्यासक्रमांसाठीचे आवश्यक शिक्षकच नसल्याने महाविद्यालयामध्ये ऑनलाईन तासिकांना सुरुवातच झालेली नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून वारंवार महाविद्यालयाकडे विचारणा करण्यात येत आहे. मात्र त्यांना शिक्षक नसल्याने ऑनलाईन तासिका होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असतानाही अद्यापही ऑनलाईन तासिका होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांनी यासंदर्भात युवासेनेकडे धाव घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे युवासेना व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने आणि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांना निवेदन देऊन महाविद्यालयात त्वरित भरती प्रक्रिया पुर्ण करुन वर्ग सुरु करावे आणि महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानीस जबाबदार धरुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

- Advertisement -

दरम्यान, स्वयं अर्थसहाय्य अभ्यासक्रमांसाठी तात्पुरत्या स्वरुपात नवीन शिक्षकांची भरती होत असल्याने दरवर्षी भरती करावी लागते. महाविद्यालयाच्या बदललेल्या व्यवस्थापनाने यंदा शिक्षक भरती केलेली नाही. त्यामुळे स्वयं अर्थसहाय्यच नाही तर अन्य अभ्यासक्रमांचे शिक्षकही उपलब्ध नाहीत. शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात एप्रिलपासून महाविद्यालयाकडून व्यवस्थापनाकडे वारंवार विनंती करण्यात येत आहे. मात्र शिक्षक भरती करण्यास व्यवस्थापनाकडून विलंब होत असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -