घरताज्या घडामोडीअखेर निर्णय झाला; राज्य सरकार 'सारथी'ला ८ कोटी देणार!

अखेर निर्णय झाला; राज्य सरकार ‘सारथी’ला ८ कोटी देणार!

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला सारखी संस्थेचा प्रश्न अखेर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मार्गी लागला असून राज्य सरकार सारथी संस्थेला ८ कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर हे ८ कोटी रुपये उद्याच सारथीला देण्यात येतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर खुद्द अजित पवार यांनीच पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे.

‘सुरुवातीची मीटिंग फिजिकल डिस्टन ठेवण्यासाठी मुख्यमंत्री जिथे प्रेस घेतात तिकडे घेतली. संबंधित विभागाचे सचिव आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. बैठकीत सर्वांची मते ऐकून घेतली. कुठल्याही परिस्थितीमध्ये सारथी संस्था बंद केली जाणार नाही. मागच्या सरकारने ही संस्था अस्तित्वात आणल्यानंतर काही प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते’, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – खासदार छत्रपती संभाजी राजे तिसऱ्या रांगेत, मंत्रालयातल्या बैठकीत गोंधळ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -