भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमांकात आचरेकर यांना आज अखेरचा निरोप देताना सचिनसह अनेक दिग्गजांना अश्रू अनावर झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्माशानभूमीत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकरने स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन आपल्या गुरूप्रतीचे प्रेम व्यक्त केले. अंत्यसंस्काराला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, राज ठाकरे यांच्यासहीत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
रमाकांत आचरेकर यांचा लाडका शिष्य सचिन तेंडुलकरने शिवाजी पार्क येथे आचरेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी सचिनला अश्रू अनावर झाले होते. | #MyMahanagar #RamakantAchrekar #RamakantAcharekar #SachinTendulkar @sachin_rt @BCCI pic.twitter.com/ADpjRtKXmI
— My Mahanagar (@mymahanagar) January 3, 2019
- Advertisement -