घरताज्या घडामोडी'कुछ बडा करेंगे'च्या हेतूनेच सचिन वाझेंनी आखला स्फोटकांच्या स्कॉर्पिओचा कट - NIA

‘कुछ बडा करेंगे’च्या हेतूनेच सचिन वाझेंनी आखला स्फोटकांच्या स्कॉर्पिओचा कट – NIA

Subscribe

पोलिस दलात पुन्हा फेम मिळवण्यासाठीच कारस्थान रचल्याची वाझेंची एनआयएपुढे कबुली

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओच्या तपासात पीपीई किटमधील व्यक्तीच्या बाबतीत आतापर्यंत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. पण नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) या प्रकरणात एका तर्कावर पोहचली आहे. पीपीई किटमधील व्यक्तीची ओळख पटवण्यात एनआयएला अखेर यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एनआयएमार्फत सुरू असलेल्या चौकशीअंती या पीपीई किटमधील व्यक्ती कोण आहे याबाबतच्या निष्कर्षावर एनआयए आली आहे. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिटचे एपीआय सचिन वाझे आणि सहकाऱ्यांच्या चौकशीनंतरच एनआयएने अंबानीच्या घरासमोर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणातला पीपीई किटमधील व्यक्ती ओळखण्यात यश मिळवले आहे.

- Advertisement -

सीसीटीव्हीमधला माणसाची ओळख पटलेली असून त्याबाबतचे आमच्याकडे पक्के पुरावे असल्याची एनआयमधील सूत्रांचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे या संपुर्ण तपासात जी मर्सिडीज गाडी सापडली आहे, या गाडीच्या तपासातूनच या पीपीई किटचे कनेक्शन उघड झाले आहे. मर्सिडीज गाडीतून जी बाटली सापडली ती केरोसीनची असून त्या केरोसीनने पीपीई किट जाळण्यात आले असा दावा एनआयएच्या टीमचा आहे. तर पीपीई किटमधली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एनआयएच्या चौकशीत सचिन वाझे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याच्या चौकशीतून हे सगळ स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात हे सगळं कारस्थान सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा एनआयएच्या टीमचा दावा आहे.

- Advertisement -

एनआयएने सचिन वाझे यांच्या चौकशीत या संपुर्ण कारस्थानाचा कबुली जबाबही सचिन वाझे यांच्याकडून मिळवण्यात यश मिळवले आहे. मुंबई पोलिस दलात पूर्वीचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण हे केलं अस वाझे चौकशीत सांगतले असल्याची माहिती आहे. १७ वर्षाच्या काळ लोटला, ‘कुछ बडा करेंगे’ आणि पुन्हा पोलीस दलात पूर्वीचा मान सन्मान मिळवण्याच्या हेतूने पोलीस अधिकारी यांनी मुकेश अंबानी च्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केली करून या गुन्ह्याचा तपास करून नाव कमावण्याच्या हेतूने त्याने हे कृत्य केल्याची कबुली वाझेने दिली असल्याची माहिती एनआयए सूत्रांनी सांगितली. पण सचिन वाझेंच्या बोलण्यावर एनआयएचा विश्वास नसल्यानेच या संपुर्ण प्रकरणातील तपास सुरूच ठेवणार असल्याचे एनआयएच्या टीमने स्पष्ट केले आहे. सचिन वाझे चौकशी प्रकरणात एनआयए प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचे एनआयएच्या टीमने सांगितले आहे. यापुढच्या दिवसात आणखी काही जणांना चौकशीला बोलावणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. एनआयएने सीएसटीच्या पार्किंग लॉटमधून जप्त केलेल्या मर्सिडीजच्या व्यतिरिक्त आणखी एक मर्सिडीज आणि स्कोडा गाडी एनआयएच्या रडारवर आहे. या सगळ्या गाड्या सचिन वाझे वापरत होते असा एनआयएचा संशय आहे. त्यामुळेच एनआयएकडून या गाड्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -