घरताज्या घडामोडीपोलिस अधिकारी असूनही 'या' कंपन्यांचे संचालक आहेत सचिन वाझे

पोलिस अधिकारी असूनही ‘या’ कंपन्यांचे संचालक आहेत सचिन वाझे

Subscribe

शिवसेनेचे अर्धा डझन नेते सचिन वाझेंचे बिझनेस पार्टनर

पोलिस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले सचिन वाझे यांचे पोलिस दलालीत सरकारी नोकरी व्यक्तीरिक्तचे काही बिझनेस कनेक्शन समोर आले आहेत. सचिन वाझे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असतानाही ते जवळपास तीन कंपन्यांवर संचालक पदी कार्यरत होते अशी माहिती समोर आली आहे. त्याव्यतिरिक्तही सचिन वाझे यांचे अनेक कंपन्यांसोबतचे बिझनेस कनेक्शन समोर आले आहे. बिझनेस कंपन्यांमध्ये कंस्ट्रक्शन कंपन्यांपासून ते मल्टी डिजिटल कंपन्यांमध्ये सचिन वाझे हे बिझनेस पार्टनर होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामध्ये शिवसेना नेत्यांचेही संबंध असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सचिन वाझे आणि शिवसेना नेत्यांचे बिझनेस कनेक्शनचा गौप्यस्फोट भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर असणाऱ्या सचिन वाझे यांचा सहभाग किती कंपन्यांमध्ये होता, तसेच या कंपन्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा कसा सहभाग होता याचा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेच्या मुलुंड ठाण्यातील नेत्यांचा सहभाग सचिन वाझे यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोणत्या कंपन्यांमध्ये आहेत सचिन वाझे संचालक ?

१. मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड
२. टेकलिगल सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड
३. डिजिनेक्स्ट मल्टी मिडिया लिमिटेड

- Advertisement -

या कंपन्यांमध्ये सचिन वाझे हे बिझनेस पार्टनर आहेत. त्याशिवाय सचिन वाझे यांचे अनेक कंपन्यांमध्ये पार्टनरशिप असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे ठाणे आणि मुलुंडमधील अर्धा डझनहून अधिक शिवसेना नेत्यांचा संबंध हा सचिन वाझे यांच्याशी बिझनेसमध्ये होता. एक पोलिस अधिकारी असूनही त्यांचे शिवसेना नेत्यांशी असलेले बिझनेसच्या निमित्ताने असलेल्या संबंधांवर किरीट सोमय्या यांनी सवाल केला आहे. सचिन वाझे यांचे बिल्डिंग कंस्ट्रक्शन ते मल्टीमिडिया कंपन्यांमध्ये संबंध होते असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआए) ने सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटमधील आणखी चार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या अधिकाऱ्यांचीही एनआयए कसून चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

मल्टीबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स

मल्टीबिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स लिमिटेड ही १९ जानेवारी २०१३ मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. बिगर सरकारी अशी कंपनी असून मुंबई येथे या कंपनीची नोंदणी आहे. शेअर कॅपिटल म्हणून या कंपनीची ५ लाख रूपयांची गुंतवणुक असून बांधकाम व्यवसायातील ही एक कंपनी आहे. या कंपनीची आतापर्यंत कोणतीही वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नसून कंपनीची बॅलेन्स शीटदेखील फाईल नसल्याचे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा डेटा आहे. या कंपनीच्या संचालक पदावर सचिन वाझे, उदय वागळे, यश वागळे, पंढरी गवई यांची संचालक म्हणून नोंदणी आहे. या कंपनीचे कार्यालय हे ठाण्यातील तीन हात नाका येथे आहे. ही ८ वर्षे ही जुनी कंपनी असून बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -