घरताज्या घडामोडीसचिन वाझेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, तब्बल तीन तास झाली चर्चा

सचिन वाझेंनी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट, तब्बल तीन तास झाली चर्चा

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच राजकारण देखील तापलं असून प्रकरणाला वेगळ्याच वादंग उठला आहे. या प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव केंद्रस्थानी आहे. आज पोलीस अधिकारी सचिन वाझे आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटले आहेत. तब्बल तीन तास सचिन वाझे आणि आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

वाझेंनी माध्यमांच्या प्रश्नांना केली टाळाटाळ

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी जोरदार आरोप केले आहेत. अशापरिस्थितीच सचिन वाझे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन वाझे म्हणाले की, मनसुख हिरेश यांच्या मृत्यूनंतर जवळपास चार ते साडे चार तासानंतर मी कळवा हॉस्पिटलला पोहोचले होतो. त्यामुळे त्यांना त्याच्या मृतदेहासोबत रुमाल आढळला, याबद्दल काही माहित नाही आहे. तसेच मला त्यांच्या कुटुंबीय काय म्हणाले?, त्याप्रकरणात कोण अधिकारी होते? याबाबत काहीच माहित नाही आहे.’

- Advertisement -

हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल समोर 

दरम्यान मनसुख हिरने यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. हिरेन यांच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमा नाही आहेत. तसेच मृत्यूचं कारण आणि कुठल्याही घातपाताचा उल्लेख शवविच्छेदन अहवालात नाही आहे. हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याआधीच १२ ते २४ तासांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.


हेही वाचा – शवविच्छेदनाचे व्हिडिओ द्या, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, हिरेन कुटुंबीयांची भूमिका

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -