सचिन वाझे बनला माफीचा साक्षीदार, सीबीआय न्यायालयाने अर्ज स्वीकारला

Sachin Waze was declared a witness to the apology

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सिचन वाझे (Sachin Waze) यांना माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय (CBI Court) न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अनिल देशमुख भ्रष्टाचाराचे मास्टरमाईंड, जामीन मिळाल्यास पुराव्यांशी छेडछाड करतील; ईडीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

सचिन वाझेला (Sachin Waze) आज सीबीआयच्या विशेष कोर्टात (CBI Court) व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. यावेळी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे नियमित जामीन अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

 हेही वाचा – अनिल देशमुख यांना झटका न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनी (Sachin Waze) कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीबीआयने त्याच्या अर्जाला सर्शर्त मंजुरी दिली असून कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडील माहिती देण्याची तायरी वाझेंनी दर्शवली आहे.