हिंमत असेल तर केतकीचे समर्थन करून दाखवाच – जितेंद्र आव्हाड

politician jitendra awhad announce his first marathi movie shahu chatrapati share video on instagram

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर केतकीच्या पोस्टचा सर्वच राजकीय पक्षांनी समाचार घेतला. यानंतर गदारोळ सुरू असतानाच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट केतकी चिथळेला समर्थन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सदाभाऊ खोत यांच्याविरोधात निदर्शने केली. यांनतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंमत असेल तर केतकीचे समर्थन करून दाखवाच असे जाहीर आव्हान सदाभाऊ खोत यांना दिले आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त जितेंद्र आव्हाड काल घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आले होते. यावेळी तिने महामानव बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत गलिछ लिखाण केले आहे. आंबेडकरी जनतेला नको नको ते संबोधले आहे. बरोबर कणखर आहे … तिला मानावे लागेल …. मराठ्याचे पोर कुणब्याचे पोर …म्हणजे काय सांगा? असा सवाल करतानाच हिम्मत असेल तर करा उघड समर्थन …., असं आव्हानच आव्हाड यांनी खोत यांना आव्हान दिले. ते बौद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हा संताप व्यक्त केला.

एका मुलीने 81 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल हीन पातळीवर भाष्य केले. त्यांच्या मरणाची इच्छा व्यक्त केली. एखादा विकृत व्यक्तीच असे बोलू आणि लिहू शकतो. तिच्याबद्दल सदाभाऊंना राग येत नसेल. पण विकृत माणसांची ती सवय असते, अशी टीकाही यावेळी आव्हाडांनी केली.यावेळी केतकीने पहिल्यांदाच असे केले नाही. तिने बौद्धांबद्दल अपशब्द वापरले. महात्मा फुलेंबद्दल लिहिले. तिच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे. तरीही तुम्ही तिला कणखर मनाचे मानता? तिच्याबद्दल एवढीच कणव असेल तर शिवाजी पार्कवर एकटेच उभे राहा आणि केतकीला समर्थन असल्याच् जाहीर करा. आहे का हिंमत तुमच्यात? असा प्रश्न जीतेंद्र आव्हाड यांनी ही केला आहे.