घरमुंबई...ते बारामतीचे बिलही भागवायचे राहिले आहे, ते ही भीक मागून भागव -...

…ते बारामतीचे बिलही भागवायचे राहिले आहे, ते ही भीक मागून भागव – सदाभाऊ खोत

Subscribe

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत एका व्हिडीओमुळे अडचणीत आले आहेत. सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर 2014 मधील उधारी मागीतली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी हॉटेल मालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. यावेळी हॉटेल मालकाने केलेल आरोप कसे खोटे आहेत हे 2014 च्या निवडणुकीच्या काही तारखा आणि कागदपत्रांद्वारे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकारावरुन सदाभाऊंवर टीका केली होती. या टीकेला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले सदाभाऊ खोत –

- Advertisement -

आमचे एक महान नेते 128 शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माझे सहकारी म्हणाले हा माझा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे. अरे त्याच्या छातीवरील बिल्ला गेला कुठे? डिजिटलवर स्वागत राष्ट्रवादीचे करतोय, कार्यक्रमात तो राष्ट्रवादीच्या आहे, राष्ट्रवादीचा नेता म्हणून तो डिजिटल लावतोय आणि आमचा शेतकरी नेता म्हणतो तो माझा स्वाभिमानीचा कार्यकर्ता आहे. त्याचे बिल मी भीक मागून देणार. त्या नेत्यालाही मी सांगतो, बारामतीला जाऊन तू फुकट जेवण करुन आलास, आमरस खाऊन आलास, ते बारामतीचे बिलही भागवायचे राहिले आहे ते ही भीक मागुन भागव. कारण तुझे आयुष्य डब्यातून पैसे गोळा करण्यातच गेले आहे. त्यामुळे मला त्याकडे फार जायचे नाही. पण राजकारणाची पोळी तापलेल्या तव्यावर भाजण्याचे काम सगळी मंडळी करत आहेत, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

स्क्रिप्ट राष्ट्रवादीची –

- Advertisement -

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. 15 एप्रिलला निवडणूक प्रचार संपला. 17 एप्रिलला मतदान झाले… तरी सुद्धा हा बहाद्दर 25 दिवस कार्यकर्त्यांना जेवायला देत होता का? महाराष्ट्रात असता कोणता लोकप्रतिनिधी आहे जो निवडणूक संपल्यानंतर महिनाभर कार्यकर्त्यांच्या जेवणावळी उठवतो. ज्या कागदावर त्याने टिपण तयार केले त्या कागदाला ९ वर्षे होत आले तरी घडी पडलेली नव्हती. आता मला प्रश्न हा पडतो. 9 वर्षे हा माणूस काही बोलला नाही. 9 वर्षानंतर ज्या तारखा त्याने सांगितल्या त्या मतदान झाल्यानंतरच्या तारखा येतात. मग मतदान झाल्यानंतरच्या तारखा तयार करताना राष्ट्रवादीच्या नेत्याने त्याला लिहून देताना किमान मतदान कधी झाले ते तरी बघायला हवे होते. कारण 17 एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाले होते, असा दाव सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -