घरCORONA UPDATECoronaVirus- देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी साईसंस्था आली धावून!

CoronaVirus- देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी साईसंस्था आली धावून!

Subscribe

जगभर हातपाय पसरणाऱ्या कोरोना विषाणूंचा पार्श्वभूमीवर संपूर्ण २१ दिवसांसाठी देशभरात लॉक डाऊन असलेल्याने मुंबईतील देहविक्रीवर व्यवसायावर परिणाम पडलेला आहे. देहविक्रीवर निर्भर असलेल्या ५०  हजार वारंगावर आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.मात्र मुंबईतील

साई संस्थाने धाव घेतली आहे. या संस्थेकडून  मुंबईतील आठ विभागात दररोज जेवणाची व्यस्था करण्यात येत आहे.  जगभर हातपाय पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे केंद्र आणि राज्य शासनाने कलम १४४ लागू केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात १४ एप्रिलपर्यत लॉक डाऊन करण्यात आले आहे.तसेच शासन प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर कामाला लागले आहे. तसेच कोरोना विषाणूचा देहविक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. “कोरोना’च्या भीतीने  मार्च महिन्याचा सुरुवातीपासून ग्राहक येत नव्हते. त्यांनंतर जनता कर्फ्यु दिवशीपासून पूर्णपणे मुंबईतील आणि उपनगरातील देहविक्री व्यवसाय बंद पडला आहे. या व्यवसायत आज जवळ ५०  हजार देहविक्री करणाऱ्या महिलांचे कुटूंब अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देहविक्री व्यवसाय बंद असल्याने अशा आपत्कालीन  परिस्थितीत कुटूंबियांना जगवाचं कस असा मोठा प्रश्न त्यांना पडला होता.  मात्र मुंबईच्या  सामाजिक संस्था ‘साई’ने पुढाकार घेऊन देहविक्री करणाऱ्या महिलांची आणि त्यांच्या कुटूंबियांची जेवणाची सोय केली आहे. दररोज संस्थेकडून जेवणाचे पॉकेट देण्यात येत आहे.

- Advertisement -

या ‘आठ’ परिसरात देते मदत

सोशल अ‍ॅक्टिव्हीज इंटिग्रेशन ‘साई’ संस्थाही मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिलांचा मदतीला धावली आहे.  जिथे देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला राहतात. तिथे दररोज एक हजारो पॅकेट जेवणाचे वितरित करत आहे. सध्या मुंबईतील कामाठीपुरा,जमुनामेशन, पाववाला स्ट्रीट, फॉकलंड रोड,  गिरगांव, ग्रँड रोड, वरळी आणि शिवडी अशा  ८ देहविक्री परिसरात जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे.  दररोज प्रत्येक परिसरात ३०० ते ४०० जेवणाचे पॉकेट वितरित करण्यात येत आहे.

- Advertisement -

५० हजार देहविक्री महिलांना कोरोनाचा फटका

“कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. मुंबईत आणि मुंबई उपनगरात जवळजवळ पन्नास हजार महिला देहविक्री व्यवसाय करतात. त्यांना सुद्धा कोरोनाचा मोठा फटका  बसला आहे. देहविक्री व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. देहविक्री करणार्‍या महिलासुद्धा आपला समाजाचा एक भाग आहे. त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यामुळे  समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी तसेच शासनाने सुद्धा यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान साई संस्थान ने केली आहेत.

देहविक्री करणार्‍या महिलासुद्धा समाजाचा एक भाग आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन  केले आहे. त्यामुळे  कामाठीपुर्‍यातील इतर परिवारातील देहविक्री करणार्‍या महिलांच्या संकटात सापडले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मदत म्हणून दररोज जेवणाचे पॉकेट वितरित करतो आहे.

– विनय वस्त, संस्थापक, सोशल अ‍ॅक्टिव्हीज इंटिग्रेशन संस्था.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -