घरताज्या घडामोडीधक्कादायक! पोलिसांच्या भीतीने घेतली उडी, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

धक्कादायक! पोलिसांच्या भीतीने घेतली उडी, सराईत गुन्हेगाराचा मृत्यू

Subscribe

पोलीस पकडण्यासाठी येत असल्याचे बघून एका सराईत गुन्हेगाराने एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना मुंब्र्यामध्ये घडली आहे.

पोलीस पकडण्यासाठी येत असल्याचे बघून एका सराईत गुन्हेगाराने एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना मुंब्र्यामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या गुन्हेगाराचा रात्री उशिरा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या गुन्हेगाराच्या दोन सहकाऱ्यांना घरात घुसून बेदम चोप दिल्यामुळे दोघेजण गंभीर जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी मुंबईतील सर जे.जे रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा सर्व प्रकार बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील मुंब्रा येथे घडली आहे. मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या मृत्यू प्रकरणी अपमृत्यूची तर दोघांना मारहाण केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहसीन उर्फ चिरा शेख (३२) असे मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून किशोर श्रीवर्धन (२३) आणि डॅनियल सेलेमण (२७) हे दोघे नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

मोहसीन उर्फ चिरा हा मुंब्रा कौसा येथील किस्मत नगर मध्ये आई आणि बहिणीसोबत राहत होता. मोहसीन हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्यची माहिती पोलिसांनी दिली. मोहसीन याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात २० ते २२ गंभीर गुन्ह्याची नोंद असून त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोहसीनच्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्यामुळे तीन वर्षांपूर्वीच मुंब्रा पोलिसांनी मोहसीन उर्फ चिरा याला मोक्का अंतर्गत अटक केली होती. तीन महिन्यांपूर्वीच मोहसीन तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. तुरुंगातून बाहेर येताच मोहसीनने पुन्हा मुंब्र्यात गुन्हेगारी कारवाया करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती.

काही दिवसांपूर्वीच मोहसीन याने एकावर तलवारीने हल्ला करून त्याला लुटले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.
मोहसीनचा शोध सुरु असताना तो कालसेकर रुग्णालयाजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत लपून बसला असल्याची माहिती बुधवारी रात्री मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोनिरीक्षक वळतकर आणि सपोनि उगलमुगले हे आपल्या पथकासह मोहसिनला अटक करण्यासाठी गेले असता पोलिसांना बघून मोहसीन हा बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पळाला त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याचा पाठलाग करीत असताना त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी टाकली त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी ताबडतोब त्याला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे आणले. त्याच्यावर उपचार सुरु असताना रात्री त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पो.नि अरुण क्षीरसागर यांनी दिली. मोहसिनचा मृत्यू झाल्याची बातमी मुंब्रा परिसरता वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी आंबेडकर नगर येथे राहणारे त्याचे साथीदार किशोर आणि डॅनियल याला नागरिकांनी घरातून बाहेर काढून बेदम मारहाण केली. यामध्ये दोघे गंभरी जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी सर जे.जे रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असल्याची माहिती सपोनी. श्रीकृष्ण नावाले यांनी दिली. मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या मृत्यू प्रकरणी अपमृत्यूची तर दोघांना मारहाण केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनमध्ये घेतला होता आश्रय

किशोर श्रीवर्धन आणि डॅनियल हे दोघे मूळचे चेन्नईत राहणारे आहेत. वर्षभरापूर्वी दोघे मुंबईत कामाच्या शोधात आले होते. घाटकोपर येथे क्रेन ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली होती. नोकरी करून दोघे घाटकोपरमध्ये राहत होते. मात्र, लॉकडाउनच्या काळात नोकरी गेल्यामुळे दोघे फिरत फिरत मुंब्रा येथे आले होते. महिन्यांभरापूर्वी मोहसीनसोबत त्यांची ओळख झाली होती. मोहसीनने त्यांना आंबेडकर नगर येथे एक झोपडे भाड्याने घेऊन दिले होते. हे दोघे मोहसीनला त्याच्या गुन्हयात मदत करीत होते, अशी माहिती पोनी क्षीरसागर यांनी दिली.


हेही वाचा – ‘या’ चित्रपटावर बंदी घालावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -