घरमनोरंजननागराजसह रिंकू, आकाशचा मनसेत प्रवेश

नागराजसह रिंकू, आकाशचा मनसेत प्रवेश

Subscribe

'सैराट'मधील आर्ची - परशा म्हणजेच रिंकू आणि आकाश यांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही मनसेचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

‘सैराट’ चित्रपटाचा झेंड अटकेपार पोहोचवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह त्यातील मुख्य कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सैराट फेम कलाकार आणि दिग्दर्शकाने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.

amey khopkar, nagraj manjule, rinku rajguru, akash thosar
मनसेत प्रवेश करण्यासाठी सैराट फेम कलाकार आणि दिग्दर्शक

‘सैराट’ ठरला सुपर डुपर हिट

एका छोट्याश्या गावातील कॉलेजमधील तरुण-तरुणीची प्रेमकहाणी सैराटमध्ये दाखवण्यात आली होती. मात्र त्यांच्या चित्रीकरणातील वैविध्यतेमुळे, त्यातील अप्रतिम गाण्यांमुळे, नवोदित कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयामुळे या चित्रपटाने राज्यातच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. हा १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. या चित्रपटांचे विविध भाषांमध्ये रिमेक करण्यात आले. दाक्षिणात्य भाषेत झालेल्या रिमेकमध्ये स्वतः रिंकूनेच आर्चीची भूमिका साकारली होती. तर बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपट निर्माता करण जोहर यानेदेखील हिंदीत ‘सैराट’चा रिमेक बनवला होता. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगा जान्हवी कपूर आणि अभिनेता इशान खट्टर यांनी ‘सैराट’च्या रिमेक ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

- Advertisement -
amey khopkar, nagraj manjule, rinku rajguru, akash thosar
मनसेत प्रवेश करताना नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर

सैराट टीम ने आज मनसे पक्षाचे प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी करून माननिय राज ठाकरे चा विचार घरा घरात पोहचवण्याचे मनापासून ठरवले. आर्ची आणि परश्या तसेच सैराट चित्रपट टीमचे मनसे आम्ही स्वागत करतो.

– अमेय खोपकर, अध्यक्ष, मनसे (चित्रपट सेना)

- Advertisement -

आर्ची – परशा झाले लोकप्रीय

चित्रपटातील प्रमुख कलाकार आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर यांना सैराट चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात लोकप्रीयता मिळाली. त्यांनतर आकाशने महेश मांजरेकर यांचा एक मराठी, तर लव्ह लस्ट या हिंदी चित्रपटात काम केले. तर रिंगू तिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. फँड्री आणि सैराट या दोनही चित्रपटांमधून मराठी सिनेसृष्टीला नागराज मंजुळेंसारखे प्रभावशाली दिग्दर्शक लाभले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -