घरमुंबई#MeTooचे धक्के : आता साजिद खाननेच सोडला ‘Houseful 4’!

#MeTooचे धक्के : आता साजिद खाननेच सोडला ‘Houseful 4’!

Subscribe

#MeToo चळवळीमध्ये साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर अक्षय कुमारने Houseful 4 चित्रपटाचं शूटिंग थांबवलं. आता सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खाननेच दिग्दर्शनाच्या जबाबदारीवरून पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या #MeToo चळवळीमध्ये अनेक सेलिब्रिटींवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले जात आहेत. विशेष म्हणजे, हे आरोप त्यांच्यासोबत काम केलेल्या महिला सेलिब्रिटिंनी केल्यामुळे बॉलिवुडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. सिने दिग्दर्शक साजिद खानवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. सर्वात आधी अभिनेत्री सलोनी चोपडाने साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर रिचल व्हाईट आणि इतरही अभिनेत्रींनी त्याच्यावर #MeToo चळवळीमध्ये आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर साजिक दिग्दर्शन करत असलेल्या ‘Houseful 4’ या सिनेमाचं शूटिंग मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारने थांबवलं होतं. मात्र, त्यानंतर आता स्वत: दिग्दर्शक साजिद खान यानेच ‘Houseful 4’ सिनेमा सोडला आहे.


वाचा कोण म्हणतंय हे – ‘साजिदने मला कपडे काढायला लावले’

- Advertisement -

साजिदने ट्विटरवर केलं जाहीर

अनेक अभिनेत्रींनी केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप आणि अभिनेता अक्षय कुमारने ‘Houseful 4’ सोडल्यानंतर साजिद खानवर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर साजिद खान याने आपण ‘Houseful 4’ सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात साजिद खानने ही पोस्ट टाकली आहे.

- Advertisement -

काय म्हणाला साजिद?

माझ्याविरोधात जे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबियांवर, चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि चित्रपटातल्या कलाकारांवर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन ‘Houseful 4’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मी सोडत आहे. जोपर्यंत मी निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी ही जबाबदारी सोडत आहे. माध्यमांमधल्या माझ्या मित्रांना माझी विनंती आहे की त्यांनी सत्य बाहेर येईपर्यंत कोणताही निर्णय देऊ नका.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -