घरताज्या घडामोडीसाकिनाका गॅस सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या ५ वर

साकिनाका गॅस सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या ५ वर

Subscribe

२४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन ६ जण जखमी झाले होते.

साकिनाका येथे २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन ६ जण जखमी झाले होते. त्यापैकी चौघांचा आतापर्यंत मृत्यू झाला. तर आणखीन दोन गंभीर जखमींपैकी एक शिफा या १६ वर्षीय मुलीचा आज उपचार सुरू असताना राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आता या घटनेतील मृतांची संख्या ५ वर गेली आहे.

आता या दुर्घटनेतील गंभीर जखमी अनिस खान (४५) यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.२४ नोव्हेंबरच्या रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास साकिनाका, जगताप वाडी, जगताप इस्टेट, जरीमरी, आनंद भुवन येथे चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. त्यावेळी जखमींना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी रात्री गंभीर जखमी अल्मस या १५ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उपचार सुरू असताना सायन रुग्णालयात अस्मा या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्री ८ वाजताच्या सुमारास याच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रिहान खान या ८ वर्षांच्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास सानिया या१४वर्षीय मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ४ वर गेली होती. त्यानंतर या घटनेतील आणखीन एक जखमी शिफा हिचा राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना १ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -