घरताज्या घडामोडीSakinaka Rape Case: अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी कोर्टात दोषारोपत्र दाखल

Sakinaka Rape Case: अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी कोर्टात दोषारोपत्र दाखल

Subscribe

साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात (Sakinaka Rape Case) दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. सर्व पुरावे एकत्र करून दिंडोशी कोर्टात ३४६ पानांचे दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणात ७७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून १८ दिवसांत दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. (346 pages charge sheet filed in 18 days in dindoshi court)

याप्रकरणात साकीनाका पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३७६, ३२३, ५०४, ३४ भादंविसह कलम ३ (१) (डब्ल्यू), ३ (२) (अ) अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नमूद गुन्ह्यात तात्काळा एका आरोपीस अटक करण्यात आली.

- Advertisement -

विशेष पोलीस पथकामधील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पथक यांनी नमूद गुन्ह्याचा तपास केला. तसेच नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीविरुद्ध वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व प्रकारचे पुरावे प्राप्त केले आहेत. या प्रकरणात ७७ साक्षीदारांचे जबाब नोंद केले असून नमूद गुन्ह्याचा तपास केवळ १८ दिवसांच्या आता पूर्ण केला आणि अटक आरोपीविरुद्ध एकूण ३४६ पानांचे दोषारोपत्र मुंबईतील दिंडोशी सत्र कोर्टात दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा – साकीनाका प्रकरण: अ‍ॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल; कुटुंबियांना २० लाखांची आर्थिक मदत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -