घरताज्या घडामोडीsakinaka rape case : साकीनाका बलात्कार प्रकरणात Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल...

sakinaka rape case : साकीनाका बलात्कार प्रकरणात Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल – हेमंत नगराळे

Subscribe

साकीनाका बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्तांनी आज पत्रकार घेत या प्रकरणत अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती आज सोमवारी दिली. या घटनेतील पीडीत महिला ही विशिष्ट समाजाची असल्याने एससी एसटी एक्ट या गुन्ह्याअंतर्गत लावण्यात आला आहे, असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केले. या संपुर्ण प्रकरणात तपास सुरू असून आरोपीला २१ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे. सोशल मिडियावर गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. म्हणूनच फॅक्च्युअल गोष्टी समोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Sakinaka rape case, mumbai police filed crime under prevention of atrocities act)

साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. या संपुर्ण घटनेचा क्राईम सीन निर्माण करण्यात आला आहे. या संपुर्ण गुन्ह्याचे डिजिटल स्वरूपातील पुरावेही गोळा करण्यात आल्याचे नगराळे यांनी सांगितले. घटनास्थळावर पीडीत महिला कधी, त्याठिकाणी आरोपी कधी आला, गुन्हा कला घडला, आरोपी घटना स्थळावरून कसा गेला ? यासाठीचा पुरावा मिळाला आहे. तसेच या गुन्ह्यातील प्रमुख हत्यारही जप्त केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या गुन्ह्यासाठी अत्यंत अनुभवी अशा वकीलांची नेमणूक करण्यात आली आहे. अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्याने विशेष वकीलांची नेमणूक या प्रकरणी केली आहे. अॅड राजा ठाकरे या क्रिमिनल लॉयरची नेमणूक या गुन्ह्यासाठी केली आहे. संपुर्ण प्रकरणातील तपासातही तेदेखील मार्गदर्शन करत आहे. गुन्ह्याची चार्जशीट एक महिन्याच्या आत दाखल करणार आहोत. पण मुख्यत्वेकरून कालावधी जाणार आहे तो डीएनएचे रिपोर्ट येण्यासाठी कालावधी लागू शकतो असेही नगराळे यांनी स्पष्ट केले आहे. पुढच्या १५ दिवसांमध्ये तपास पूर्ण होऊ शकतो, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीतून राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी घटना स्थळाला भेट दिली आहे. तसेच तपास आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यासोबतच राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरूण हल्दर यांची
आज दीड वाजता मुख्यमंत्री, गृहमंत्री हलदार आणि मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव गृह, डीजी, सोशल, महिला बाल कल्याणच्या अतिरिक्त सचिव यांची सह्याद्रीवर बैठक झाली. त्यांनी पोलिसांनी कारवाई, तपास केला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांसमोर पोलिसांचे कौतुक केले आहे. ज्या विविध शासकीय मदत योजना आहेत त्याचा लाभ पिडीतेच्या कुटूंबीयांना देण्यात येणार आहे. पीडीत महिलेच्या कुटूंबीयांसाठी एकुण २० लाखांची मदत करण्यात येईल. या पीडीत महिलेच्या तीन मुलींना कालांतराने सगळी प्रक्रिया पार पाडत ही मदत करण्यात येणार आहे. आणखी शासकीय योजनांमध्ये जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्यात येईल असेही नगराळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, ACP ज्योत्सना रासम करणार तपास


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -