Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या डॅशिंग एसीपी जोत्स्ना रासम आहेत तरी कोण?

साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या डॅशिंग एसीपी जोत्स्ना रासम आहेत तरी कोण?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचे काल, शनिवारी समोर आले. शुक्रवारी एका ३२ वर्षांच्या महिलेवर तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने अमानुष मारहाण करुन तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला. यामध्ये ती गंभीररीत्या जखमी झाली, रक्तस्त्राव झाल्याने तिचा राजावाडी रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या धक्कादायक घटनेचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून एका महिन्यात या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला जाणार आहे. दरम्यान काही तासांत या घटनेतील पळून गेलेल्या आरोपीला साकिनाका पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या डॅशिंग सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम कोण आहेत, ते आज आपण जाणून घेणार आहे.

ज्याोत्स्ना रासम या डॅशिंग पोलीस असल्याची त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. ज्योत्स्ना रासम यांचा जन्म मुंबईत झाला असून त्या मूळच्या राजापूरच्या आहेत. पण त्यांचं आयुष्य मुंबईचं गेलं आहे. वांद्र्यातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या ज्योत्स्ना रासम यांचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि चेतना महाविद्यालयात झालं आहे. त्यांचे वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची. त्यांचे संपूर्ण शिक्षण आई-वडिलांनी केलं, कधीही आबाळ होऊ दिलं नाही, असं त्या सांगतात.

- Advertisement -

ज्योत्स्ना यांना खेळाची, फिरण्याची खूप आवड आहे. त्या खूप चांगल्या गिर्यारोहक असून त्यांनी अनेक शिखरं पादक्रांत केली आहेत. यामध्ये १९९१ मध्ये त्यांनी हनुमान तिब्बा, शितीतधर आणि फ्रेंडशिप ही तीन शिखरं चढल्या आहेत. २७ वर्षांपूर्वी ज्योत्स्ना पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या.

आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल ज्योत्स्ना रासम यांनी केली आहे. यामध्ये मुद्रांक घोटाळ्यातील तपास, अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिचे हत्या प्रकरण, २०११ मधील हैदराबादहून मुंबईला तस्करी करण्यात आलेले १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे आणि सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणे, दुबईच्या रोशन अन्सारीच्या मुसक्या आवळणे अशा अनेक गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा जबाब नोंदवण्याचं काम ज्योत्स्ना रासम यांनीचं केलं होत.

ज्योत्स्ना रासम यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

- Advertisement -

ज्योत्स्ना रासम यांनी चारचाकी वाहनाने भ्रूणहत्येच्या विरोधात अवघ्या ११ दिवसांमध्ये १३ राज्यात ६५८० किलोमीटर प्रवास केला. यामुळे कमी वेळात वेगवान प्रवास करणारी महिला म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

मर्दानीसाठी ज्योत्स्ना यांनी राणी मुखर्जीला दिली ट्रेनिंग

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेत्री राणी मुखर्जीचा चित्रपट ‘मर्दानी’ चांगलाचं लोकप्रिय झाला. या चित्रपटासाठी ज्योत्स्ना रासम यांनी राणी मुखर्जीला ट्रेनिंग दिलं होतं. त्यावेळेस त्या गुन्हे शाखेच्या कक्ष ८ मध्ये कार्यरत होत्या.


हेही वाचा – साकीनाकामध्ये निर्भया! ३२ वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार


 

- Advertisement -