घरमुंबईरेल्वेला स्वच्छतेसाठी पुरस्कार कर्मचार्‍यांच्या वेतनाची मारामार

रेल्वेला स्वच्छतेसाठी पुरस्कार कर्मचार्‍यांच्या वेतनाची मारामार

Subscribe

दोन महिन्यांपासून वेतन थकीत

एकीकडे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी चांगल्या साफ-सफाईसाठी 50 हजार रूपयांचा पुरस्कार मध्य रेल्वेला घोषित केला आहे, दुसरीकडे आम्हा गरीब सफाई कर्मचार्‍यांची रेल्वे बॉर्डाच्या अध्यक्षांनी थट्टा केल्याचा आरोप सफाई कर्मचार्‍यांनी केला आहे. आजपर्यंत 400 कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. कर्ज घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह सुरु आहे. त्यामुळे रेल्वे बॉर्डाच्या अध्यक्षांना याची दखल घेण्यासाठी कर्मचारी दाद मागणार आहेत.

रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा रेल्वेने सुरू केला आहे. मात्र या खासगीकरणाचे चटके रेल्वे स्थानकांवरील गरीब सफाई कर्मचार्‍यांना बसू लागले आहेत. सफाई कर्मचार्‍यांना रेल्वेतील खासगी कंत्राटदारांकडून वेतन, गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे खासगी रेल्वे सफाई कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन याबद्दल तक्रार केली. मात्र, तरी सुध्दा काही झाले नाही. मात्र शनिवारी रेल्वे बॉर्डाचे अध्यक्ष मुंबई दौर्‍यावर होते. त्यांनी आपल्या निरीक्षण दौर्‍यात सीएसएमटी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. त्यात उत्तम साफ-सफाई आणि चांगल्या देखभालसाठी 50 हजार रुपयाचे पारितोषिकांची घोषणा केली. मात्र ज्यांच्या जीवावर हा पुरस्कार मिळाला ते कर्मचारी आपल्या वेतनासाठी रेल्वेच्या अधिकार्‍यांच्या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून चकरा मारत आहेत.

- Advertisement -

रेल्वेकडे आम्ही यासंबंधी तक्रार केली आहे. मात्र, रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे आता 180 सफाई कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करत आहे, अशी माहिती सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर सफाई कामगार गणेश मंगल तरे यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

रेल्वेचे दुर्लक्ष

सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे स्वच्छतेचे कंत्राट डायनेमिक कंपनीला दिला होता. या कंपनीचे कंत्राट 5 नोव्हेंबरला संपले आहे. कंपनीकडे एकूण 182 सफाई कर्मचारी होते. मात्र गेल्या काही दिवसापासून कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. आक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पाच दिवसांचे वेतन थक्कीत आहे.तसेच वाडीबंदर मध्य दुसर्‍या कंत्राटादाराने तिथे काम करणार्‍या 205 कर्मचार्‍यांचे वेतन थकीत ठेवले होते. रेल्वेकडे तक्रार करुन सुध्दा अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचा, आरोप कामगारांनी केला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -