घरताज्या घडामोडीरेल्वेकडून ३ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकले; कुटुंबावर उपासमारीची वेळ

रेल्वेकडून ३ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकले; कुटुंबावर उपासमारीची वेळ

Subscribe

रेल्वेच्या साडेतीन हजार कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोना विषाणूने जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या कोरोना विषाणू विरोधात दोन हात करण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. मात्र, असे असून देखील रेल्वेच्या साडेतीन हजार कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट

संपूर्ण विश्वात हाहा:कार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत देशासह मुंबईतही निर्माण झाली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. या आपत्कालीन परिस्थितीत स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर आणि पोलीस यांचे वेतन कपात न करण्याचे तसेच त्यांना तात्काळ वेतन देण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचबरोबर श्रम मंत्रालयकडून सुद्धा, असे आदेश जारी केले आहे. मात्र, तरीसुद्धा आज अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात साडेतीन हजार स्वच्छता कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम कार्यरत आहे. अगोदरच तुटपुंजा पगारात ते काम करत असताना, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यात वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेले असून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधानाच्या आदेशाचे पालन केलेले नाही

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडे कंत्राटदाराने वेतन मागितले आहे. मात्र, अद्यापही रेल्वे प्रशासनाने कंत्राटदाराला वेतन दिलेले नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे, अशी माहिती सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे महामंत्री अमित भटनागर यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यादरम्यान, देशातील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे स्वच्छता कर्मचारी डॉक्टर पोलीस यांचे वेतन थकीत न ठेवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, आज या आदेशाचे पालन रेल्वे प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही. स्वच्छता कंत्राटदाराकडे कामगारांना वेतन देण्यास पैसे नसल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन थकित ठेवलेले आहे.

- Advertisement -

कामावर येण्याचे काढले आदेश

१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन संपणार आहे. त्यानंतर रेल्वे गाड्या सुरू होणार की नाही, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाने १० एप्रिलपासून कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे कामावर कसे यायचे? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

गरीब कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची आज परिस्थिती अत्यंत वाईट आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वेने तात्काळ पैसे कंत्राटदाराला देण्यात यावेत. तसेच देशाचे पंतप्रधान यांनी देशातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करण्याचे आणि वेळेत वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशचे पालन सुद्धा रेल्वेने केले पाहिजे. – अमित भटनागर, महामंत्री, सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघ


हेही वाचा – कोरोनामुळे ‘या’ राज्याने वाढवला लॉकडाऊन


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -